एक्स्प्लोर

MS Dhoni : धोनीचे सलग दोन षटकार, चाहत्यानं आयपीएलची सुरक्षा भेदली, माहीच्या पाया पडला अन् मिठी मारली

IPL : आयपीएलमध्ये काल झालेल्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्जला 35 धावांनी पराभूत केलं. यामॅचमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यानं आयपीएलची सुरक्षा भेदली. 

अहमदाबाद : आयपीएलमध्ये (IPL) काल गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आमने सामने आले होते. गुजरातनं या मॅचमध्ये चेन्नईला 35 धावांनी पराभूत करत आयपीएलमधील आपलं आव्हान कायम ठेवलं. चेन्नईनं टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातनं शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या शतकांच्या जोरावर 231 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईला अपयश आलं. महेंद्रसिंह धोनीनं 11 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली मात्र तो संघाला यश मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईच्या डावाच्या 20 व्या ओव्हरमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला. महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यानं थेट आयपीएलची सुरक्षा (IPL Security Breach) भेदली आणि मैदानावर एंट्री घेतल्यानं थोडा वेळ गोंधळ उडाला होता. 

महेंद्रसिंह धोनीचे सलग दोन षटकार आणि चाहता थेट मैदानात 

महेंद्रसिंह धोनी 17 व्या ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी मैदानात आला. त्यानंतर 20 व्या ओव्हरच्या पहिल्या आणि दुसऱ्या बॉलवर धोनीनं सलग दोन षटकार मारले आणि तिसऱ्या बॉलवर त्यानं एकही रन घेतली नाही. मात्र, यानंतर धोनीच्या चाहत्यानं आयपीएलची सुरक्षा भेदली आणि तो मैदानात धोनीच्या दिशेनं धावत सुटला. धोनी जवळ पोहोचल्यानंतर त्यानं धोनीला मिठी मारली आणि  धोनीच्या पाय पडून त्याला नमस्कार केला. 

धोनीची लोकप्रियता कायम

महेंद्रसिंह धोनीनं गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद मिळवून दिलं होतं. महेंद्रसिंह धोनीचं वय सध्या 42 वर्ष असून तो जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. सध्या धोनी जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसला तरी त्याच्या लोकप्रियतेत कमी झालेली नाही.  चेन्नईची मॅच ज्या ठिकाणी असेल तिथं धोनीचे चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. 

महेंद्रसिंह धोनीनं 20 व्या ओव्हरमध्ये राशिद खानला पहिल्याच बॉलवर हेलिकॉप्टर शॉट मारत षटकार लगावला. यानंतर दुसऱ्या बॉलवर देखील धोनीनं एका हातानं सिक्स मारला. यानंतर धोनीच्या चाहत्यानं आयपीएलची सुरक्षा भेदली आणि धोनीच्या पाया पडला. यानंतर त्याला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतल मैदनावरुन बाहेर नेलं. 

दरम्यान, गुजरात टायटन्सनं पराभवाची मालिका खंडीत केली आहे. गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्जवर 35 धावांनी विजय मिळवला. धोनीनं 11 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली. यामध्ये त्यानं तीन सिक्स मारले.  

संबंधित बातम्या : 

Ireland Vs Pakistan: आयरलँडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, बाबरसेनेची हाराकिरी, वर्ल्डकपपूर्वी मोठा उलटफेर

IPL 2024 CSK vs GT: गुजरातने चेन्नईचा केला पराभव; शुभमन गिल अन् साई सुदर्शन चमकले, राशीद खानने सामना फिरवला!
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : Maharashtra News : 27 March 2025 : 7 PMGirish Mahajan : जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्यानं दुखापत, कसा घडला अपघात?Waghya Statue Issue | वाघ्याा कुत्र्याच्या स्मारकावरुन संभाजीराजे एकाकी? राऊत काय म्हणाले?Top 50 Superfast News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 27 March 2025 : 6 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
RCB vs CSK : चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला महत्त्वाचा सल्ला
चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला लाखमोलाचा सल्ला
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Embed widget