Ireland Vs Pakistan: आयरलँडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, बाबरसेनेची हाराकिरी, वर्ल्डकपपूर्वी मोठा उलटफेर
Ireland vs Pakistan : आयरलँडनं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानला पराभूत करत विजय मिळवला.
डबलिन : टी-20 वर्ल्ड कप सुरु होण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी राहिलेला असताना क्रिकेट विश्वात खळबळजनक घटना घडलीय. आयरलँडनं (Ireland) पाकिस्तानला (Pakistan) दणका दिला आहे. टी-20 वर्ल्ड कपची पूर्वतयारी म्हणून पाकिस्तान आणि आयरलँडमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानला पराभवाचा धक्का बसला आहे. डबलिन मध्ये झालेल्या मॅचमध्ये आयरलँडनं पाकिस्तानल 5 विकेटनं पराभूत करत इतिहास रचला. आयरलँडनं टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानवर पहिला विजय मिळवला.2007 मध्ये पाकिस्तानला एकदिवसीय सामन्यात आयरलँडनं पराभवाचा धक्का दिला होता. पाकिस्ताननं पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 विकेटवर 182 धावा केल्या होत्या. आयरलँडनं ही मॅच 5 विकेट राखून आणि एक बॉल शिल्लक असताना जिंकली.
बाबर आझमची संथगतीनं फलंदाजी
पाकिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी केली मात्र त्यांना सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. मोहम्मद रिजवान धावबाद झाला. यानंतर बाबर आझम फलंदाजीला आला. पाकिस्तानच्या टीमनं पॉवरप्लेमध्ये केवळ 38 धावा केल्या होत्या. यामध्ये बाबर आझमच्या नावावर 19 बॉलमध्ये 15 धावा होत्या. पुढे 39 व्या बॉलवर बाबर आझमनं अर्धशतक पूर्ण केलं. बाबर आझमचे हे 35 वं अर्धशतक ठरलं. बाबर आझम आणि सइम आयूब या दोघांनी 85 धावांची भागिदारी केली होती. सइम आयूबनं 29 बॉलमध्ये 45 धावा केल्या. बाबर आझमनं 43 बॉलमध्ये 57 धावांची खेळी केली.
यानंतर पाकिस्तानच्या मधल्या फळीला देखील दमदार फलंदाजी करता आली नाही. फखर जमाननं 18 बॉलमध्ये 20 धावा केल्या. आझम खान आणि शादाब खान शुन्यावर बाद झाले. इफ्तिखार अहमदनं 15 बॉलमध्ये 37 धावा केल्या आणि संघाला 182 धावांपर्यंत पोहोचवलं. शाहीन आफ्रिदीनं देखील 8 बॉलमध्ये 14 धावा केल्या. अखेरच्या दोन ओव्हरमध्ये पाकिस्ताननं 31 धावा केल्यानं त्यांना 182 धावांपर्यंत मजल मारता आली.
An historic win. What a game. What a chase! 💯#IREvPAK #BackingGreen ☘️🏏 pic.twitter.com/xlHNCdPOea
— Cricket Ireland (@cricketireland) May 10, 2024
आयरलँडनं इतिहास रचला
आयरलँडच्या डावाची सुरुवात देखील चांगली झाली नाही. पॉल स्टर्लिंग 8 आणि फिर टकर 4 धावा करुन बाद झाले. आयरलँडच्या डावाला अँड्रयू बलबिरनी आणि हैरी टेकर या दोघांनी सावरलं. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची खेळी केली. यानंतर इमादव वसीमनं टेकरला 36 धावांवर बाद केलं.
बलबिरनी यानं अर्धशतक झळकावत एका बाजूनं आयरलँडचा डाव सावरला. त्यानं 55 बॉलमध्ये 77 धावांची खेळी केली. डॉकरेलनं 12 बॉलमध्ये 24 धावा केल्या.
अखेरच्या ओव्हरचा थरार
आयरलँडला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 11 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवर कर्टिस कॅम्परनं अब्बास आफ्रिदीला चौकार मारला. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर दोन धावा काढल्या. यानंतर चौथ्या बॉलवर त्यानं पुन्हा एकदा चौकार मारला. पाचव्या बॉलवर एक रन घेत आयरलँडच्या फलंदाजांनी इतिहास रचला.
संबंधित बातम्या :