एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IPL 2023 : नेट बॉलर ते गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज, आशिष नेहराच्या एका फोनमुळे बदललं मोहित शर्माचं नशीब

Mohit Sharma IPL Comeback : मोहित शर्माने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय किक्रेटमध्ये पदार्पण केलं होतं. तो एकेकाळी टीम इंडियाच्या वनडे संघाचा महत्त्वाचा भाग होता.

Mohit Sharma IPL Comeback : भारतासाठी विश्वचषक खेळणाऱ्या मोहित शर्माने (Mohit Sharma) गोलंदाजाने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाकडून आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये पुनरागमन केलं. तब्बल तीन वर्षानंतर मोहित शर्मा आयपीएल टी 20 लीगमध्ये परतला आहे. हा प्रवास मोहित शर्मासाठी सोपा नव्हता. गेल्या मोसमात म्हणजेच आयपीएल 2022 मध्ये मोहित गुजरात संघाचा नेट गोलंदाज होता आणि यंदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात त्याला आयपीएल 2023 मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. 34 वर्षीय मोहित खराब फॉर्म आणि नंतर दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. पण कर्णधार हार्दिक पांड्याने पंजाब विरुद्धच्या सामन्यात मोहितला गुजरातकडून गोलंदाजी करण्याची संधी दिली आणि मोहितनं या संधीचा पुरेपुर फायदा घेत चमकदार कामगिरी केली.

तब्बल तीन वर्षानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन

तब्बल 3 वर्षांनंतर पुनरागमनाच्या सामन्यात मोहित शर्मानं शानदार गोलंदाजी केली. मोहितने 4 षटकात 18 धावा देत 2 बळी घेतले. मोहितनं आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू सॅम करन याला बाद केले. सॅमला पंजाब किंग्जने 18.5 कोटींना विकत घेतलं आहे. त्यामुळे हा दिवस मोहितसाठी फार खास होता. गेल्या मोसमात नेट बॉलर आणि यंदाच्या मोसमातील पहिल्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या मोहित शर्माचं नशीब आशिष नेहरा यांच्या एका फोन कॉलमुळे बदललं.

आशिष नेहराचा मोहित शर्मा फोन

पंजाब किंग्सवर विजय मिळवल्या मोहित शर्माने मागील तीन वर्षांचा त्याचा प्रवास सांगितला. मोहितने सांगितलं की, ''मी पदार्पणाबद्दल उत्सुक होतो. पण, अनेक वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करताना थोडी धाकधूकही होती. मागील वर्षी पाठीच्या शस्त्रक्रियेतून सावरल्यानंतर मी देशांतर्गत क्रिकेट खेळलो. मी देशांतर्गत क्रिकेट खेळलो आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यानंतर मला गेल्या मोसमात आशिष नेहराचा फोन आला. त्याने मला गुजरात टायटन्ससाठी नेट गोलंदाज म्हणून बोलवलं. घरी बसण्यापेक्षा मी नेट बॉलर बननं पसंत केलं.'' त्यानंतर यंदा मोहितला गुजरात संघातून पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने उत्तम दोन विकेट घेतल्या.

हार्दिक पांड्याने मोहित शर्माला दिली संधी

यंदाच्या मोसमात मोहित शर्माने तब्ब्ल तीन वर्षानंतर आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. याआधी मोहित आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासाठी शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर आता तीन वर्षानंतर मोहितनं आयपीएल टी 20 लीगमध्ये दमदार पदार्पण केलं आहे. या सामन्यात त्याच्या दमदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. हार्दिक पांड्याने संधी दिल्यानं मोहित शर्माचं नशीब पुन्हा एकदा उजळलं आहे.

2013 साली आयपीएलमध्ये पदार्पण

स्फोटक गोलंदाजीमुळे मोहित शर्माचं आयपीएल 2013 मध्ये पदार्पण झालं होतं. त्याने 2013 साली धोनीच्या नेतृत्वात त्याने चेन्नई संघातून इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्सचाही भाग होता. 

आयपीएल 2017 पर्यंत कायम होती मोहितची जादू 

यानंतर मोहितने चेन्नईसाठी सातत्याने महत्त्वाच्या गोलंदाजाची भूमिका बजावली. आयपीएल 2017 पर्यंत त्याने आपल्या गोलंदाजीने विरोधी फलंदाजांना अडचणीत आणलं होतं. पण त्यानंतर त्याचा खराब फॉर्म सुरू झाला. आयपीएल 2018 ते आयपीएल 2020 पर्यंत मोहितला फक्त 11 सामने खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल 2021 आणि आयपीएल 2022 मध्ये तो सामील नव्हता होता. त्यानंतर आयपीएल 2022 मध्ये मोहित शर्मा नेट बॉलर राहिला होता. मात्र, 34 वर्षीय मोहितने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केलं आहे.

2013 मध्ये आंतरराष्ट्रीय किक्रेटमध्ये पदार्पण

2013 मध्ये मोहित शर्माने आंतरराष्ट्रीय किक्रेटमध्ये पदार्पण केलं. तो एकेकाळी टीम इंडियाच्या वनडे संघाचा महत्त्वाचा भाग होता. मोहित शर्माने 2013 ते 2015 दरम्यान, भारतीय संघासाठी 26 एकदिवसीय सामने खेळले आहेत.. मोहितने आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 37 विकेट घेतल्या आहेत. 

धोनीने चेन्नई संघासाठी केली निवड 

मोहित शर्मा 2012-13 रणजी मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा पाचवा गोलंदाज ठरला होता. त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे त्याला धोनीने चेन्नई संघात स्थान दिलं होतं. आयपीएल 2013 (IPL 2013) मध्ये तो चेन्नई संघाचा भाग होता.  मोहितने आयपीएलच्या पहिल्या सत्रात 20 विकेट घेतल्या होत्या. याच कारणामुळे त्याला यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Embed widget