Mohammed Shami :भरमैदानात जे घडलं ती शरमेची गोष्ट, त्यानं चुकीचा संदेश जातो, मोहम्मद शमीची केएल राहुलसाठी बॅटिंग
KL Rahul : केएल राहुल संजीव गोयंका वादावर टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीनं प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली : लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यातील मॅचनंतर केएल राहुल (KL Rahul) आणि संजीव गोयंका (Sanjiv Goenka) यांच्यात वाद झाला होता. या वादाचे पडसाद अद्याप उमटत आहेत. लखनौ सुपर जाएंटसचे मालक संजीव गोयंका यांनी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या पराभवानंतर केएल राहुलला ऑन कॅमेरा जाब विचारला होता. यावरुन संजीव गोयंका यांच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली होती. लखनौ सुपर जाएंचटसच्या पराभवानंतरही क्रिकेटचे चाहते केएल राहुलच्या बाजूनं उभे राहिले आहेत. आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) देखील केएल राहुलच्या समर्थनार्थ उभा राहिला आहे.
मोहम्मद शमी काय म्हणाला?
टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीनं खेळाडू आणि संघमालक दोघेही सन्माननीय व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे पाहून लोकं काही गोष्टी शिकत असतात. कॅमेऱ्याच्या समोर अशा गोष्टी घडणं शरमेची बाब आहे. मोहम्मद शमीनं या प्रकरणी भाष्य केलं असलं तरी आतापर्यंत लखनौ सुपर जाएंटसचे मालक संजीव गोयंका किंवा केएल राहुलनं कोणतंही भाष्य केलेलं नाही.
मोहम्मद शमीनं क्रिकबझ सोबत बोलताना या प्रकरणावर भाष्य केलं. खेळाडूंची देखील इज्जत असते आणि तुम्ही देखील सन्माननीय व्यक्त आहात, कारण तुम्ही संघमालक आहात. काही लोक तुम्हाला पाहत असतात आणि तुमच्याकडून काही गोष्टी शिकत असतात. लखनौच्या मॅचनंतर जे ऑन कॅमेरा घडलं ते शरमेची गोष्ट आहे, असं मोहम्मद शमी म्हणाला.
मोहम्मद शमी पुढं म्हणाला की कॅप्टनला सार्वजनिक रित्या बोलण्यापेक्षा खासगीमध्ये तुम्ही या गोष्टी सांगू शकला असता. तुम्हाला या गोष्टी करायच्या असत्या तर तुम्ही ड्रेसिंग रुम किंवा हॉटेलमध्ये देखील करु शकला असता मात्र, मैदानावर अशा गोष्टी करण्याची गरज नव्हती, असं शमीनं म्हटलं.
केएल राहुलला पाठिंबा देताना मोहम्मद शमी पुढं म्हणाला की तो कॅप्टन असून काही सामान्य खेळाडू नाही. हा एक खेळ आहे. जर प्लॅन यशस्वी नाही झाला तर ही काही मोठी गोष्ट नाही. खेळात काहीही होऊ शकतं. काही दिवस चांगले किंवा वाईट असू शकतात. मात्र, खेळाडूंचा सन्मान देखील महत्त्वाचा असता. बोलण्याची एक पद्धत असते, अशा घटनांमुळं चुकीचा संदेश जातो, असं मोहम्मद शमी म्हणाला.
दरम्यान, लखनौ सुपर जाएंटसचे सलग दोन पराभव झाल्यानं त्यांच्या प्लेऑफमधील प्रवेशाचा मार्ग खडतर झालाय.
संबंधित बातम्या :
Virat Kohli : राइली रुसोचं एक नंबरी सेलिब्रेशन, विराट कोहलीचा दस नंबरी पलटवार, पाहा व्हिडीओ