Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात अहंकार, रोहित शर्मा अन् बुमराहचा दाखला देत एबी डी विलियर्सचा हल्लाबोल, म्हणाला...
Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्सचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपलं आहे. प्लेऑफची दारं त्यांच्यासाठी बंद झाली आहेत.
IPL 2024 Mumbai Indians नवी दिल्ली :आयपीएलमध्ये तब्बल पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सचा विजेतेपदाचा दुष्काळ यंदाही कायम राहणार आहे. मुंबई इंडियन्सनं 2020 मध्ये शेवटचं विजेतेपद मिळवलं होतं. आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावण्याच्या इराद्यानं मुंबईच्या मॅनेजमेंटनं गुजरात टायटन्सचा कॅप्टन असलेल्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) ट्रेड करुन मुंबईच्या संघात सहभागी करुन घेतलं. मुंबई इंडियन्सनं त्याला ट्रेडकरुन संघात घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून जाहीर केलं. मुंबईच्या टीमनं हार्दिकच्या नेतृत्त्वात आयपीएलच्या विजेतेपदाची मोहीम सुरु केली मात्र, त्यांना पहिल्याच मॅचमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. गुजरात विरुद्धचा पहिल्याच मॅचमधील पराभव ते आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून पहिल्यांदा बाहेर पडणारा संघ असा मुंबई इंडियन्सचा प्रवास झाला. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याच्या नेतृत्त्वशैलीवर एबी डी विलियर्सनं (Ab De Villiers) मोठं वक्तव्य केलं आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वशैलीत अहंकार दिसून येतो, असं त्यानं म्हटलं. एबी डि विलियर्सनं रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहबाबत देखील मोठं वक्तव्य केलंय.
एबी डी विलियर्स काय म्हणाला?
एबी डी विलियर्सनं हार्दिक पांड्यांच्या नेतृत्त्वात अहंकार दिसून येतो, असं म्हटलं आहे. हार्दिक पांड्या स्वत:ला धोनीप्रमाणं शांत आणि संयमी समजतो मात्र तसं नाही. हार्दिक पांड्याची नेतृत्त्वशैली गुजरात टायटन्स सारख्य नवख्या खेळाडूंपुढं योग्य ठरु शकते. मात्र, ज्या मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह सारखे वरिष्ठ खेळाडू आहेत तोपर्यंत अशी नेतृत्त्व शैली योग्य ठरत नाही, असं एबी डी विलियर्सनं म्हटलं.
एबी डी विलियर्सनं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर यासंदर्भात भाष्य केला. तो म्हणाला "हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वशैली धाडसीपणा आहे मात्र त्यामध्ये अहंकार आहे. मला वाटतं मैदानावर जे घडतं ते वास्तव असतं असतं. मात्र, त्यानं ठरवलंय त्याच्या नेतृत्त्वाची शैली अशीच आहे. धोनी प्रमाणं नेतृत्त्व करण्याचा त्याचा प्रयत्न असतो.
जेव्हा तुम्ही अनुभवी खेळाडूंसोबत खेळता, बऱ्याच कालावधीनंतर तुम्ही एकत्र येता, त्यावेळी अनुभवी खेळाडू तुमच्याशी सहमत होत नाहीत. हार्दिकच्या नेतृत्त्वाची शैली गुजरात टायटन्स सारख्या संघात योग्य ठरु शकते. कारण गुजरातची टीम युवा खेळाडूंनी भरलेली होती, असं डी विलियर्सनं म्हटलं.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाबद्दल बोलातना एबी डी विलियर्सनं ग्रॅमी स्मिथचं उदाहरण दिलं. मला ग्रॅमी स्मिथ आठवतात, ते आपल्या टीमसाठी तिथं उपलब्ध असायचे. एक युवा खेळाडू म्हणून मला केवळ त्यांचं अनुकरण करायचं होतं. सध्या रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह आहेत.
अखेरीस एबी डी विलियर्सनं हार्दिक पांड्याचं कौतुक देखील केलं. हार्दिक पांड्या खेळताना पाहताना मला आनंद देखील होतो. हार्दिक पांड्याची छाती बाहेर काढण्याची स्टाईल मला आवडते. मी देखील त्यासारखाच होतो, असं डी विलियर्स म्हणाला.
संबंधित बातम्या :
KL Rahul : लखनौ सुपर जाएंटस केएल राहुलविरोधात मोठी पावलं उचलणार, कॅप्टनपद जाऊ शकतं अन्...