(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli : राइली रुसोचं स्नाइपर सेलिब्रेशन,विराट कोहलीकडून काही मिनिटात बदला, पाहा व्हिडीओ
IPL 2024 : पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात धर्मशाला स्टेडियमवर मॅच पार पडली. या मॅचमध्ये बंगळुरुनं विजय मिळवला.
धर्मशाला : भारतीय क्रिकेट टीमचा आघाडीचा फलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli ) आणि पंजाबचा खेळाडू राइली रुसो यांनी केलेलं सेलिब्रेशन चर्चेत आलंय. पंजाब किंग्जचा खेळाडू राइली रुसोनं (Rilee Rossouw) अर्धशतक झाल्यानंतर स्नाइपर सेलिब्रेशन केलं होतं. रुसो बाद होताच विराट कोहलीनं पलटवार करत त्याच प्रकारे सेलिब्रेशन केलं.
पाहा काय घडलं?
आरसीबीनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 7 विकेटवर 241 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्जचा फलंदाज राइली रुसो यानं दमदार फलंदाजी केली. राइली रुसोनं अवघ्या 21 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केल होती. यानंतर त्यानं अर्धशतकाचं स्नाइपर स्टाइलनं सेलिब्रेशन केलं. रुसोनं 27 बॉलमध्ये 225 च्या स्ट्राइक रेटनं 61 धावा केल्या आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. यानंतर विराट कोहलीनं रुसोच्या स्नाइपर सेलिब्रेशनला हटके स्टाइलनं प्रत्युत्तर दिलं.
पंजाब किंग्जच्या डावाच्या नवव्या ओव्हरमध्ये आरसीबीकडून लेग स्पिनर कर्ण शर्मा बॉलिंग करत होता. कर्ण शर्माच्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर राइली रुसो स्ट्राइक वर होता. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. अर्धशतक झाल्यानंतर स्नाइपर सेलिब्रेशन करणाऱ्या राइली रुसोला विराट कोहलीनं देखील स्नाइपर सेलिब्रेशन करुन प्रत्युत्तर दिलं.
For Every Action There Is Equal And Opposite Reaction.
— Neku Nagauri {Nek Sa} (@NekuNagauri3) May 10, 2024
What A Electrifying RunOut!!
KING KOHLI MANIA EVERYWHERE ON THE FIELD.#RCBvPBKS #ViratKohli𓃵 #PBKSvsRCB #ViratKohli pic.twitter.com/qcGXemIbaG
पंजाब किंग्ज आयपीएलच्या बाहेर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पंजाब किंग्जचा 60 धावांनी पराभव केला.आरसीबीनं पहिल्यांदा फलंदाजी करातना 7 विकेटवर 241 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्जचा संघ 17 ओव्हरमध्ये 181 धावा करुन बाद झाला. यंदाच्या आयपीएलमधील आठव्या पराभवासह पंजाब किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे.
विराट अन पाटीदारची दमदार खेळी
पंजाब किंग्जनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मॅच निकाल पाहता हा निर्णय पंजाबला महागात पडल्याचं समोर आलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 7 विकेटवर 241 धावा केल्या होत्या. यामध्ये विराट कोहलीच्या 92 धावा आणि रजत पाटीदारच्या 55 आणि कॅमेरुन ग्रीनच्या 46 धावांचा समावेश होता.
पंजाब किंग्जकडून जॉनी बेयरस्टो, राइली रुसो, शशांक सिंग आणि सॅम करन यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. जॉनी बेयरस्टोनं 27 धावा, राइली रुसोनं 61 धावा, शशांक सिंग 37 आणि सॅम करन यानं 22 धावा केल्या.
संबंधित बातम्या :