एक्स्प्लोर

IPL 2023 : चेन्नईकडून पराभवानंतर कोहलीने शेअर केला धोनीसोबतचा खास फोटो, कॅप्शनवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

Virat Kohli & MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर कोहली धोनीसोबतचा खास फोटो शेअर केला आहे.

Virat Kohli And MS Dhoni Photo : आयपीएल 2023 मध्ये 24 व्या सामन्यात महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला. विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांच्यात मैदानात आणि मैदानावर बाहेर एक खास नातं आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये खूप चांगली मैत्री आहे. दोन्ही खेळांडूंच्या मनात एकमेकांसाठी अफाट प्रेम आणि मान आहे. विराट कोहली आणि धोनी नेहमीची एकमेकांचं कौतुक करताना पाहायला मिळतं. आता चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पराभवानंतर कोहलीने धोनीसोबतचा खास फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 

चेन्नईकडून पराभवानंतर कोहलीने शेअर केला धोनीसोबतचा खास फोटो

चेन्नई विरुद्धच्या सामन्यात बंगळुरुचा पराभव झाला. चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीसाठीची खास भावनिक पोस्ट शेअर केली आहे. कोहलीने धोनीसोबतचा एक फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना विराट कोहलीने कॅप्शनमध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचा हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. या दोन हार्ट इमोजींमध्ये प्लसचं चिन्ह देखील आहे. त्यापुढे बरोबर (=) चिन्ह लिहून पुढे धोनी असं कॅप्शन कोहलीने दिलं आहे. विराटने या फोटोमध्ये महेंद्र सिंह धोनीलाही टॅग केलं आहे.

कॅप्शनवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

खास कॅप्शन देत म्हणाला...

विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी यांच्यातील मैत्रीचं खास नातं जगजाहीर आहे. विराटने हा फोटो शेअर करत पुन्हा चाहत्यांना याची जाणीव करुन दिली आहे. चेन्नई आणि बंगळुरु यांच्यातील सामन्यानंतर धोनी आणि कोहली एकमेकांमबरोबर बोलताना दिसले. यावेळी दोन्ही खेळाडूंच्या चेहऱ्यावर हास्य होतं. त्यादरम्यानचा हा फोटो विराट कोहलीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. लाखो चाहत्यांना या फोटोला लाईक करत त्यानवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

या दोन्ही दिग्गज खेळाडूंना एकत्र मैदानावर पाहणं म्हणजे क्रिकेटच्या चाहत्यांसाठीचा खास क्षण आहे. हा क्षण तितकाच दोन्ही खेळाडूंसाठी खास ही आहे. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेम आणि तितकाच सन्मान आहे. याची प्रचिती वेळोवेळी येते. कोहली आणि धोनीमध्ये एक गुरु शिष्याचं नातं आहे. या दोन्ही खेळांडूंच्या मधील या भावना कायम दिसून येतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Virat Kolhi IPL : बॅट चालली नाही, सामना गमावला आणि आता लाखोंचा दंड... कोहलीच्या अडचणीत वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget