IPl 2023 : महाराष्ट्रात राहात असाल तर वानखेडेवर एकदा जा - सारंग साठे
MI vs RCB, IPl 2023 : मुंबई आणि आरसीबी यांच्यात आज वानखेडेवर सामना रंगणार आहे.
MI vs RCB, IPl 2023 : मुंबई आणि आरसीबी यांच्यात आज वानखेडेवर सामना रंगणार आहे. प्लेऑफसाठी मुंबई आणि आरसीबी या दोन्ही संघाला विजय मिळवावाच लागेल. आरबीसीविरोधातील सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. अभिनेता सांरग साठे याची ती पोस्ट आहे. मुंबई इंडियन्सच्या जर्सीत सारंग प्रेक्षकांना खास सल्ला देतोय.. महाराष्ट्रात राहत असाल.. मराठी असाल तर एकदा वानखेडेवर नक्कीच जा.. असे सारंग याने सांगितलेय. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
सारंग साठे याने वानखेडेवरील आपला अनुभव शेअर केलाय. यामध्ये तो मराठी माणसाला वानखेडेवर जाण्याचा सल्ला दिलाय.
पाहा व्हिडीओ....
“If you live in Maharashtra, you have to visit Wankhede” 🏠💙
— Mumbai Indians (@mipaltan) May 9, 2023
Sarang Sathaye was 🤯 after his first ever Wankhede visit and why not 🤩#OneFamily #MIvRCB #MumbaiMeriJaan #MumbaiIndian #UltraTechMILive @BhaDiPa pic.twitter.com/jXdU25rU0p
कोण आहे सारंग साठे ?
सारंग साठे हा अभिनेता, भाडिपा या युट्यूब चॅनलचा संस्थापक आणि स्टँडअप कॉमेडियन आहे. त्यानं मी वसंतराव, उबुंटू या चित्रपटात काम केलं असून भाडिपा या युट्यूब चॅनलच्या 'आई आणि मी ' या सीरिजमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. 'आई आणि मी' या सीरिजमधील त्याच्या बबू या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध बंगळुरु सामना पाहायला मिळणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही हीच धावसंख्या दिसून आली आहे. वानखेडेच्या सपाट मैदानावर गोलंदाजांना विकेट घेण्यात विशेष मदत मिळत नाही. येथे बाऊंड्री लाईन जवळ असल्याने फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं.
MI vs RCB, IPL 2023 : कुणाचं पारड जड?
मुंबई इंडियन्स विरुद्धा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना कोणता संघ जिंकेल हे सांगणं कठीण आहे. पण गेल्या सहा सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर आपलं वर्चस्व मिळवलं आहे, ते पाहता बंगळुरु संघ हा सामना जिंकण्याची शक्यता जास्त आहे. यंदाच्या आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पाचव्या सामन्यात आमने-सामने आले होते.
MI vs RCB Head to Head : मुंबई विरुद्ध बंगळुरु, हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघ एकूण 31 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबई संघ वरचढ ठरला आहे. मुंबईने 17 सामने जिंकले आहेत, तर आरसीबी संघाला फक्त 14 सामने जिंकता आले आहेत. आयपीएल 2023 मध्येही हे दोन संघ आमने-सामने आले होते. या सामन्यात बंगळरुने मुंबईचा 8 विकेट्सने पराभव केला. मुंबईला आज पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळणार आहे.