MI vs DC: मुंबईच्या अखेरच्या सामन्यात अर्जून तेंडूलकर खेळणार? दोन वर्षाची प्रतिक्षा आज संपणार?
MI vs DC: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे.
![MI vs DC: मुंबईच्या अखेरच्या सामन्यात अर्जून तेंडूलकर खेळणार? दोन वर्षाची प्रतिक्षा आज संपणार? MI vs DC: Will Arjun Tendulkar play in Mumbai Indian's Last Match Of IPL 2022? MI vs DC: मुंबईच्या अखेरच्या सामन्यात अर्जून तेंडूलकर खेळणार? दोन वर्षाची प्रतिक्षा आज संपणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/21/6d785422166588a9ed49f0b62a3d25e2_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MI vs DC: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. या हंगामात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात मुंबईच्या संघानं 13 सामन्यापैकी 10 सामने गमावले आहेत. ज्यामुळं मुंबईला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागलं होतं. आज मुंबई- दिल्ली (MI vs DC) एकमेकांविरोधात या हंगामातील आपपला शेवटचा सामना खेळणार आहे. मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जून तेंडूलकर (Arjun Tendulkar) आजच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे.
“पुढच्या आयपीएल सीझनसाठी आम्हाला नवीन खेळाडूंची चाचपणी करायची आहे. यासाठी आम्ही काही नव्या खेळाडूंना खेळण्याची संधी देऊ शकतो”. असं मुंबईचा कर्णधार रोहित शर्ममा हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यावेळी म्हणाला होता.अर्जुन कधी एकदाचा मुंबई इंडियन्सकडून खेळेल, याची चाहत्यांना गेल्या दोन वर्षांपासून उत्सुकता लागली आहे. मुंबईचा संघ या हंगामातील त्यांचा अखेरचा सामना खेळणार आहे. या सामन्यात अर्जून तेंडूलकर मुंबई इंडियन्सची जर्सी घालून मैदानात उतरू शकतो.
अर्जून तेंडूलकरला संधी मिळणार का?
आयपीएलच्या मेगाऑक्शनमध्ये मुंबईच्या संघानं अर्जून तेंडूलकरला 20 कोटीत विकतं घेऊन संघात सामील केलं होतं. मात्र, अद्याप त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, शनिवारच्या सामन्यात अर्जुनला निश्चित आयपीएल पदार्पण करण्याची संधी मिळेल, असं अर्जुनच्या पदार्पणाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना वाटत आहे.
बंगळुरूच्या संघाचा मुंबई इंडियन्सला पाठिंबा
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ आज दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. मुंबई- दिल्ली सामन्यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या सामन्याच्या निकालानंतर प्लेऑफसाठी पात्र ठरणाऱ्या चौथ्या संघाचं नाव स्पष्ट होणार आहे. आजचा हा सामना दिल्लीनं जिंकला तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरेल. परंतु, मुंबईनं या सामन्यात विजय मिळवल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफचं तिकीट मिळेल. आतापर्यंत गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. यासामन्यापूर्वी बंगळुरूचे खेळाडू मुंबईच्या संघाला पाठिंबा देताना दिसत आहेत.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)