बूम बूम...बुमराहचा भेदक बाऊन्सर पृथ्वीला समजलाच नाही, खेळपट्टीवरच कोसळला, त्यानंतर...
MI vs DC, IPL 2022 : अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
What a catch by Ishan, diving forward. pic.twitter.com/umSPkLE8zN
— Johns. (@CricCrazyJohns) May 21, 2022
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. दिल्लीच्या डावातील तिसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहनं डेव्हिड वार्नरच्या (5 धावा) रुपात दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यानंतर मिचेश मार्शही (0 धाव) डेनियल सॅम्सच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. गेल्या काही सामन्यांपासून संघाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉ (24 धावा) आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या करेल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, तोही पावर प्लेच्या अखेरच्या षटकात बाद झाला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं सघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही संघाची धावसंख्या पुढे नेता आली नाही. त्यानं 33 चेंडूत 39 धावा केल्या. दिल्लीकडून रोव्हमन पॉवेलनं सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. ज्यात चार षटकार आणि एक चौकाराचा समावेश होता. रोव्हमन पॉवेल बाद झाल्यानंतर दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा गाठता आला नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, रमनदीप सिंहला दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, डेनियल्स सॅम्स, मयांक मार्कंडेय यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
हे देखील वाचा-
- IPL 2022: रियान परागचं मिशन एबी डिव्हिलियर्स! चेन्नईविरुद्ध सामन्यात मोडला रोहित शर्मा, रवींद्र जडेजाचा 'हा' विक्रम
- IPL 2022: रियान परागचं मिशन एबी डिव्हिलियर्स! चेन्नईविरुद्ध सामन्यात मोडला रोहित शर्मा, रवींद्र जडेजाचा 'हा' विक्रम
- MI vs DC Toss Report: मुंबईत दोन तर, दिल्लीच्या संघात एक महत्वाचा बदल, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन