आरसीबीची प्रथम फलंदाजी, दोन्ही संघात महत्वाचे बदल, पाहा प्लेईंग 11
RCB vs LSG, IPL 2023 : लखनौचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
RCB vs LSG, IPL 2023 : लखनौचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल करण्यात आला आहे. लखनौच्या संघात मार्क वूड परतलाय तर आरसीबीने वेन पार्नेल याला संधी दिली आहे. त्याशिवाय अनुज रावत आणि मोहिपाल लमोरोर यालाही प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय.
नाणेफेक जिंकल्यानंतर केएल राहुल याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो म्हणाला की, हे माझं होम ग्राऊंड आहे. या मैदानाचा इतिहास पाहता येथे दुसऱ्या डावात फलंदाजी करणारा संघाचा दबदबा असल्याचे दिसतेय. आज लखनौचा संघ विजय मिळवेल, असाही दावा राहुलने केलाय.
🚨 Toss Update 🚨@LucknowIPL win the toss and elect to field first against @RCBTweets.
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023
Follow the match ▶️ https://t.co/76LlGgKZaq#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/8NyHz9KgRa
🪙 We win the toss; we're chasing!#RCBvLSG | #IPL2023 | #LucknowSuperGiants | #LSG | #GazabAndaz
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 10, 2023
पाहूयात दोन्ही संघात कोण कोणते खेळाडू प्लेईंग 11 मध्ये आहेत. कुणाला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्यात आलेय
आरसीबीच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण ?
विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), मोहिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अनुज रावत, डेविड विली, वेन पार्नेल, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू -
प्रभुदेसाई, ब्रेसवेल, सोनू यादव, दीप
लखनौचे 11 नवाब कोणते? -
केएल राहुल (कर्णधार), काइल मायर्स, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पांड्या, निकोलस पूरन, जयदेव अनाडकद, अमित मिश्रा, आवेश खान, मार्क वूड, रवि बिश्नोई
राखीव खेळाडू कोणते ?
आयुष बडोनी, स्वप्निल, गौतम, सॅम्स
Match 15. Royal Challengers Bangalore XI: F Du Plessis (c), V Kohli, M Lomror, G Maxwell, D Karthik (wk), S Ahmed, A Rawat, H Patel, D Willey, M Siraj, W Parnell. https://t.co/76LlGgKZaq #TATAIPL #RCBvLSG #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023
Match 15. Lucknow Super Giants XI: K L Rahul (c), K Mayers, N Pooran (wk), D Hooda, M Stoinis, K Pandya, A Mishra, R Bishnoi, A Khan, J Unadkat, M Wood. https://t.co/76LlGgKZaq #TATAIPL #RCBvLSG #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023
केएल राहुलचे होम ग्राउंड -
केएल राहुलने आरसीबीविरोधात मागी सात डावात तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावत 474 धावा केल्या आहेत. यादरम्यान राहुल तीन वेळा नाबाद राहिलाय.
42 (27), 132* (69), 61* (49), 91* (57), 39 (35), 30 (24), 79 (58) अशा धावा राहुलने मागील सात डावात आरसीबीविरोधात केल्या आहेत. आकडेवारीवरुन राहुल आरसीबीविरोधात मोठी खेळी करतो, हे स्पष्ट होतेच. पण लखनौसाठी आणखी एक जमेची बाजू म्हणजे, आज होणारा सामना राहुलच्या होम ग्राऊंडवर होत आहे. राहुल मुळचा कर्नाटकचा आहे. त्याचे होम ग्राऊंड एम चिन्नास्वामी स्टेडिअम आहे. तो घरच्या मैदानावर अधिक आक्रमकपणे फलंदाजी करु शकतो. त्याशिवाय प्रेक्षकांचा सपोर्टही मिळू शकतो.
लखनौला विजायाची गरज -
केएल राहुल याची बॅट आरसीबीविरोधात तळपतेय. पण लखनौला आतापर्यंत आरसीबीविरोधात विजय मिळवता आलेला नाही. गेल्या हंगामातील दोन्ही सामन्यात आरसीबीने बाजी मारलेली आहे. अशा परिस्थितीत लखनौला पहिल्या विजयासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.