एक्स्प्लोर

LSG vs PBKS, IPL 2023 : सॅम करन-राबाडाचा भेदक मारा, लखनौची 159 धावांपर्यंत मजल, राहुलचे अर्धशतक

LSG vs PBKS, IPL 2023 : कर्णधार सॅम करन आणि कगिसो रबाडा यांच्या भेदक माऱ्यापुढे लखनौचा संघाने निर्धारित 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 159 धावांपर्यंत मजल मारली.

LSG vs PBKS, IPL 2023 : कर्णधार सॅम करन आणि कगिसो रबाडा यांच्या भेदक माऱ्यापुढे लखनौचा संघाने निर्धारित 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 159 धावांपर्यंत मजल मारली. लखनौकडून कर्णार केएल राहुल याने 74 धावांची खेळी केली. राहुलचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंजाबला विजयासाठी 160 धावांची गरज आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फंलदाजी करताना लखनौने वादळी सुरुवात केली. केएल राहुल आणि काइल मायर्स यांनी धावांचा पाऊस पाडला. विशेषकरुन मायर्स याने पावरप्लेमध्ये धावांची लयलूट केली. मायर्स याने 23 चेंडूत तीन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 29 धावा केल्या. राहुल आणि मायर्स यांनी पहिल्या विकेटसेठी 53 धावांची भागिदारी केली. मायर्स बाद झाल्यानंतर दीपक हुड्डा याला मोठी खेळी करता आली नाही. हुड्डा दोन धावा करुन तंबूत परतला. त्याला सिकंदर रजा याने बाद केले. 

केएल राहुल आणि कृणाल पांड्या यांनी लखनौचा डाव सावरला. राहुल आणि पांड्या यांनी संयमी फलंदाजी करत लखनौची धावसंख्या हालती ठेवली. पण रबाडाने एकाच षटकात लखनौला दोन धक्के देत बॅकफूटवर ढकलले. रबाडाने सेट झालेल्या कृणाल पांड्याला 18 धावांवर बाद केले. त्यानंतर भन्नाट फॉर्मात असलेला निकोलस पूरनला शून्यावर तंबूत धाडले. लागोपाठ दोन विकेट पडल्यामुळे लखनौची धावगती मंदावली. त्यातच मोक्याच्या क्षणी सॅम करन याने धोकादायक मार्कस स्टॉयनिस याला बाद करत लखनौच्या अडचणीत आणखी वाढ केली. 

राहुलचे संयमी अर्धशतक -

एकीकडे लखनौचे फलंदाजांनी ठरावीक अंताराने विकेट फेकत असतानाच दुसरीकडे केएल राहुल याने संयमी फलंदाजी केली. केएल राहुल पहिल्या चेंडूपासूनच धावसंख्या हालती ठेवत फलंदाजी करत होता. दुसऱ्या बाजूला सातत्याने विकेट पडत असल्यामुळे राहुल याचा स्ट्राईक रेटही घसरला होता. राहुल याने अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. पण अर्शदीप याने राहल याला बाद केले. राहुल याने 56 चेंडूत 74 धावांची खेळी केली. या खेळीत राहुलने एक षटकार आणि आठ चौकार लगावले.

पंजाबचा भेदक मारा - 

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या पंजाब संघाने लखनौच्या फलंदाजांना ठरावीक अंतराने बाद केले. पंजाबच्या गोलंदाजांनी लखनौला मोठी भागिदारी करु दिली नाही. सॅम करन, अर्शदीप, सिकंदर रजा, कगिसो रबाडा, हरप्रीत ब्रार यांनी अचूक टप्प्यावर मारा केला आहे. सॅम करन यने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर कगिसो रबाडा याने दोन जणांना तंबूत पाठवले. अर्शदीप सिंह, हरप्रीत ब्रार आणि सिकंदर रजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

राहुलने मोडला गेलचा विक्रम -

केएल राहुल यान दमदार अर्धशतकी खेळी करत आयपीएलमध्ये चार हजार धावांचा पल्ला पार केला. राहुल याने 105 डावात चार हजार धावांचा पल्ला पार केला. यासह राहुल याने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चार हजार धावांचा पल्ला पार करण्याचा विक्रम केलाय. राहुलने युनिवर्स बॉस केएल राहुल याचा विक्रम मोडीत काढलाय. ख्रिस गेल याने ११२ डावात चार हजार धावा करण्याचा विक्रम केला होता. पण आज राहुलने हा विक्रम मोडला. राहुल याने अवघ्या १०५ डावात चार हजार धावा केल्या आहेत.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
काल शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट झाला आज अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde at Mahim | विरोधकांच्या पायाखालची जमिन सरकली, सरवणकर निवडून येणारचOne minute One Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 13 नोव्हेंबर 2024 : ABP Majha LiveAshish Shelar : अनिल देशमुखांवरच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी कराBag Checking Case Maharashtra | हेलिकॉप्टरची तपासणी कोण करतात? एफएमटी पथक म्हणजे नेमकं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
काल शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट झाला आज अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, काय घडलं?
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
Embed widget