एक्स्प्लोर

नारायण-सॉल्टनं पंजाबला धू धू धुतलं, कोलकात्याची 261 धावांपर्यंत मजल

IPL 2024 : सुनिल नारायण आणि फिलिप सॉल्ट यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्यानं निर्धारित 20 षटकात 6 विकेटच्या मोबदल्यात 261 धावांपर्यंत मजल मारली.

KKR vs PBKS, IPL 2024 : सुनिल नारायण आणि फिलिप सॉल्ट यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्यानं निर्धारित 20 षटकात 6 विकेटच्या मोबदल्यात 261 धावांपर्यंत मजल मारली. सॉल्ट यानं 75 तर नारायण यानं 71 धावांची खेळी केली. पंजाबकडून अर्शदीपनं दोन विकेट घेतल्या. पंजाबला विजयासाठी 262 धावांचं आव्हान मिळालं आहे. 

कोलकात्याची वादळी सुरुवात - 

पंजाबचा कर्णधार सॅम करन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कोलकात्याच्या सुनिल नारायण आणि फिलिप सॉल्ट जोडीनं पंजाबच्या प्लॅनिंगवर पाणी फेरले. सॉल्ट आणि नारायण यांनी पहिल्या चेंडूपासूनच पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. सॅम करन, रबाडा, अर्शदीप आणि हर्षल पटेल यांची गोलंदाजी फोडून काढली. या जोडीने पॉवरप्लेमध्येच 76 धावांचा पाऊस पाडला. तर 48 चेंडूमध्ये 100 फलकावर झळकावलं. सुनिल नारायण यानं 23 चेंडूत अर्धशतक ठोकलं, तर सॉल्ट यानं 25 चेंडूत अर्धशतक झळकावलं. नारायण आणि सॉल्ट यांनी 10.2 षठकात 1138 धावांची भागिदारी केली. यंदाच्या हंगामातील ही सर्वात मोठी सलामीची भागिदारी ठरली.

नारायणचं वादळ - 

सुनिल नारायण यानं नेहमीप्रमाणेच चौफेर फटकेबाजी केली. नारायण यानं पंजाबची गोलंदाजी फोडून काढली. नारायण यानं 222 च्या स्ट्राईक रेटने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. नारायण यानं 32 चेंडूमध्ये 71 धावाचा पाऊस पाडला. सुनिल नारायण यानं आपल्या वादळी खेळीमध्ये चार गगनचुंबी षटकार ठोकले. त्याशिवाय नऊ चैकारांचा पाऊस पाडला. 

फिलिप सॉल्टचं धमाकेदार अर्धशतक - 

सुनिल नारायण आणि सॉल्ट यांनी दोन्ही बाजूंनी पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सॉल्ट यानेही नारायण प्रमाणेच प्रत्येक चेंडू सिमापार पाठवयचा प्रयत्न केला. सॉल्ट यानं 202 च्या स्ट्राईक रेटने धावा जमवल्या. सॉल्ट आणि नारायण यांनी शतकी भागिदारी केली. सॉल्ट यानं 37 चेंडूमध्ये 75 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये सहा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. 

कोलकात्याचा फिनिशिंग टच - 

नारायण आणि सॉल्ट यांनी शानदार सुरुवात दिल्यानंतर उर्वरित फलंदाजांनी फिनिशिंगचं काम चोख बजावलं.  आंद्रे रसेल यानं 12 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी केली. रसेल यानं दोन षटकार आणि दोन चौकार ठोकले. तर श्रेयस अय्यर यानं 10 चेंडूमध्ये 28 धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये श्रेयस अय्यर यानं तीन षटकार आणि एक चौकार ठोकला. रिंकू सिंह चार चेंडूत पाच धावा काढून बाद झाला. रमणदीप तीन चेंडूत सहा धावा काढून नाबाद राहिला. वेंकटेश अय्यरनं शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली वेंकटेशनं 23 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आमि तीन चौकारांचा समावेस आहे. 

पंजाबची गोलंदाजी कशी राहिली ?

कोलकात्याविरोधात पंजाबच्या गोलंदाजांना भेदक मारा करता आला नाही. कगिसो रबाडा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. रबाडानं तीन षटकात 52 धावा खर्च केल्या, एक विकेटही मिळाली नाही. अर्शदीप सिंह यानं चार षटकात 45 धावा खर्च केल्या, त्याला दोन विकेट मिळाल्या. सॅम करन यानं चार षटकात 60 धावा खर्च करत एक विकेटघेतली. हर्षल पटेल यानं तीन षटकात 48 धावा खर्च करत एक विकेट घेतली. राहुल चाहर यानं 4 षटकात 33 धावा खर्च करत एक विकेट घेतली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget