केएल राहुलवरील शस्त्रक्रिया यशस्वी, स्टार खेळाडूने सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
KL Rahul Injury Update : केएल राहुल याला एक मे रोजी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती.
KL Rahul Injury Update : केएल राहुल याला एक मे रोजी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. आरसीबीविरोधात फिल्डिंग करताना केएल राहुल दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे उर्वरित आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या फायनलला तो मुकलाय. राहुलच्या दुखापतीचा फटका टीम इंडियासोबत लखनौलाही बसलाय. राहुलच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. केएल राहुल याच्या मांडीवरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. राहुलने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.
केएल राहुल याने आपल्या सर्जरीनंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये राहुल म्हणाला की, माझी सर्जरी यशस्वी झाली आहे.. डॉक्टर आणि मेडिकल कर्मचाऱ्यांचे आभार.. त्यांच्यामुळेच आज मला दुखापतीतून सावरण्यास मदत झाली. आता मी रिकव्हरीवर लक्ष केंद्रीत करणार आहे. लवकरच मैदानात पुनरागमन करेल...धन्यवाद! दरम्यान, दुखापतीमुळे केएल राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपला मुकणार आहे. पण आशिया कप आणि वनडे वर्ल्डकपपूर्वी तो संघात पुनरागमन कऱण्याची शक्यता आहे.
पाहा केएल राहुल याची पोस्ट -
09.05.23 pic.twitter.com/r0CxIbhVfD
— K L Rahul (@klrahul) May 9, 2023
राहुलची खराब कामगिरी -
केएल राहुल याला यंदा लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. धावा जमवण्यात राहुलला अपयश आलेच.. पण स्ट्राईक रेटही खूप कमी होता. राहुल याने 9 डावात 34 च्या सरासरीने 274 धावा केल्या आहेत. फक्त दोन अर्धशतके झळकावता आली आहेत. राहुल दुखापतमुळे आयपीएल स्पर्धेतून बाहेर गेलाय. लखनौ संघाने राहुलच्या जागी अष्टपैलू कृणाल पांड्या याच्याकडे धुरा सोपवली आहे.
सात जूनपासून रंगणार सामना -
WTC 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सात जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या फायनलला सुरुवात होणार आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर हे दोन्ही संघ एकमेंकसमोर उभे असतील.
टीम इंडियाला मोठा धक्का
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सात जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या फायनलला सुरुवात होणार आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर हे दोन्ही संघ एकमेंकसमोर उभे असतील. ऑस्ट्रेलिया आणि भारताने आपल्या टीमची घोषणा केली आहे. काही खेळाडू इंग्लंडमध्ये सराव करत आहेत. तर काही खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलपूर्वी राहुलच्या दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यात राहुलची भर पडली.
धोनी म्हातारपणी कसा दिसेल, उतारवयातील रोहित ओळखता येईल? AI ने बनवलेले फोटो बघाच!
IPL 2023 : चढाओढ फक्त तुमच्या डोक्यात, खरी स्पर्धा... नवीन उल हकनंतर विराट कोहलीची पोस्ट चर्चेत
Video: 23 वर्षीय नवीन उल हक, केवळ विराटच नव्हे तर आफ्रिदी, परेरा आणि डॉर्सीलाही भिडला!
पुन्हा भिडले... ! गौतम गंभीर-नवीन अन् लखनौने विराट कोहलीला डिवचले, किंगचे चाहते भडकले