IPL 2023 : चढाओढ फक्त तुमच्या डोक्यात, खरी स्पर्धा... नवीन उल हकनंतर विराट कोहलीची पोस्ट चर्चेत
Virat Kohli News : विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची झाली होती. या वादाचा दुसरा अंक सोशल मीडियावर सुरु झालाय.
Virat Kohli vs Naveen Ul Haq : आरसीबी आणि लखनौ यांच्यात एक मे रोजी झालेला सामना वादामुळेच गाजला होता. विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची झाली होती. तेव्हापासून सुरु झालेला वाद अद्याप शमलेला नाही. या वादाचा दुसरा अंक सोशल मीडियावर सुरु झालाय. विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात सोशल वॉर सुरु आहे. मुंबई आणि आरसीबी यांच्यातील सामन्यावेळी आणि सामन्यानंतर नवीन उल हक आणि गौतम गंभीर याने सोशल मीडियावर पोस्ट करत विराट कोहलीला डिवचले होते. आता विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत नवीन उल हक याला प्रत्युत्तर दिलेय. आता विराट कोहीलच्या पोस्टवर नवीन उलहक काय प्रतिक्रिया देतोय... याकडे लक्ष लागलेय.
विराट कोहलीने काय पोस्ट केली...
विराट कोहलीने स्वत:चा एक खास फोटो पोस्ट केलाय.. त्या फोटोला दिलेले कॅप्शन सध्या चर्चेचा विषय आहे. विराट कोहली कॅप्शनमध्ये म्हणतोय..... चढाओढ फक्त तुमच्या डोक्यात असते... रिअॅलिटीमध्ये खरी स्पर्धा स्वत:शीच असते..
View this post on Instagram
विराट कोहलीच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. विराट कोहलीच्या या पोस्टला नवीनच्या पोस्टशी जोडत चर्चा सुरु आहे. वानेखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने आरसीबीचा दारुण पराभव केला. सूर्यकुमार यादव याच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर मुंबईने आरसीबीचा सहा विकेटने पराभव केला. आरसीबीच्या दारुण पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्स, नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांनी विराट कोहलीला डिवचले होते. नवीन उल हकने इन्स्टाग्राम स्टोरीवर आंबा खातानाचा फोटो शेअर केला आहे. यात समोर टीव्ही स्क्रीनवर मुंबई-आरसीबी सामन्यावेळी पियुष चावला दिसत आहे. या स्टोरीवर नवीन उल हकने 'स्वीट मँगोज' असं कॅप्शन लिहिलं होते.
लखनौ आणि आरसीबी यांच्यातील सामना विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यातील वादाने गाजला होता. त्यानंतर गुजरात आणि लखनौ यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहलीने लखनौला डिवचले होते. वृद्धीमान साहा आणि राशिद खान यांच्या खेळीचे विराट कोहलीने कौतुक केले होते. यावरुन विराट कोहलीला लखनौच्या चाहत्यांनी ट्रोल केले होते. पण आता आरसीबीच्या पराभवानंतर लखनौने डिवचलेय. तर विराट कोहली बाद झाल्यानंतर गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांनी ट्वीट करत डिवचले होते. आता विराट कोहलीने एकप्रकारे पोस्ट करत प्रत्युत्तर दिलेय.
Video: 23 वर्षीय नवीन उल हक, केवळ विराटच नव्हे तर आफ्रिदी, परेरा आणि डॉर्सीलाही भिडला!
पुन्हा भिडले... ! गौतम गंभीर-नवीन अन् लखनौने विराट कोहलीला डिवचले, किंगचे चाहते भडकले