पुन्हा भिडले... ! गौतम गंभीर-नवीन अन् लखनौने विराट कोहलीला डिवचले, किंगचे चाहते भडकले
Virat kohli vs Gautam Gambhir : आरसीबीच्या दारुण पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्स, नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांनी विराट कोहलीला डिवचलेय.
Virat Kohli vs Gautam Gambhir, LSG and Naveen : वानेखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने आरसीबीचा दारुण पराभव केला. सूर्यकुमार यादव याच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर मुंबईने आरसीबीचा सहा विकेटने पराभव केला. आरसीबीच्या दारुण पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्स, नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांनी विराट कोहलीला डिवचलेय. सोशल मीडियावर पोस्ट करत विराट कोहलीला डिवचलेय. यावर आता विराट कोहली काय प्रतिक्रिया देतोय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लखनौ आणि आरसीबी यांच्यातील सामना विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यातील वादाने गाजला होता. त्यानंतर गुजरात आणि लखनौ यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहलीने लखनौला डिवचले होते. वृद्धीमान साहा आणि राशिद खान यांच्या खेळीचे विराट कोहलीने कौतुक केले होते. यावरुन विराट कोहलीला लखनौच्या चाहत्यांनी ट्रोल केले होते. पण आता आरसीबीच्या पराभवानंतर लखनौने डिवचलेय. तर विराट कोहली बाद झाल्यानंतर गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांनी ट्वीट करत डिवचलेय.
नवीन उल हकने इन्स्टाग्राम स्टोरीवर आंबा खातानाचा फोटो शेअर केला आहे. यात समोर टीव्ही स्क्रीनवर मुंबई-आरसीबी सामन्यावेळी पियुष चावला दिसत आहे. या स्टोरीवर नवीन उल हकने 'स्वीट मँगोज' असं कॅप्शन लिहिलं आहे. विराटची विकेट आपण एन्जॉय केल्याचं नवीनने अप्रत्यक्षपणे स्टोरीतून सांगितलं आहे. नवीन उल हकच्या या पोस्टनंतर विराट कोहलीचे चाहते मात्र चांगलेच संतापले आहेत. त्याशिवाय सूर्यकुमार यादव आणि नेहाल वढेरा यांनी वादळी खेळी करत मुंबईला विजय मिळवून दिला.. या दोघांचा फोटो नवीन याने इन्स्टावर पोस्ट केला करत खास कॅप्शन लिहिले.. त्यानंतर विराट कोहलीचे चाहते चांगलेच संतापले.
Naveen Ul Haq's Instagram story. pic.twitter.com/aebF7H6gS9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 9, 2023
गौतम गंभीर याची एक पोस्टही सध्या चर्चेता आहे. गौतम गंभीर यानेही आपल्या इन्स्टाग्रावर स्टोरीवर जेसन बेहरनड्रॉफ याच्या गौलंदाजीचे कौतुक केलेय. जेसन बेहरनड्रॉफ याने पहिल्याच षटकात विराट कोहलीला बाद केले होते. विराट कोहली बाद झाल्यानंतर जेसन बेहरनड्रॉफ याचा फोटो इन्स्टा स्टोरीवर पोस्ट करत गौतमने विराटला डिवचलेय. गौतम गंभीर याने काही वेळानंतर स्टोरी डिलिट केल्याचे दिसतेय. पण अनेकांनी तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट पोस्ट केलाय.
View this post on Instagram
नवीन उलहक आणि गौतम गंभीर याच्याशिवाय लखनौ सुपर जायट्ंसनेही विराट कोहली याच्याशी पंगा घेतलाय. आरसीबीचा दारुण पराभव झाल्यानंतर लखनौने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. त्यामुळे आरसीबी आणि विराट कोहली यांचे चाहते भडकलेत. सूर्यकुमार यादव याचा 2020 मध्ये मधील एक फोटो पोस्ट केलाय... सूर्यकुमार आणि विराट कोहली यांची आयपीएलमध्ये बाचाबाची झाली होती. त्यावेळी सूर्यकुमार यादव याने वादळी खेळी करत आरसीबीचा पराभव केला होता. आजही सूर्यकुमार यादव याने वादळी फलंदाजी करत आरसीबीचा पराभव केला. या सामन्यानंतर लखनौने सूर्याचा फोटो पोस्ट करत उद्यापासून एक आठवड्याची सुट्टी.. असे पोस्ट केलेय.
Kal se ek hafte ki chutti, Sky? pic.twitter.com/FJ9P8X5FKz
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 9, 2023
नवीन उल हक, गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांच्या पोस्टनंतर विराट कोहलीचे चाहते भडकले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये वादंग सुरु आहे. आता विराट कोहली काय भूमिका घेतोय.. याकडे लक्ष लागलेय.
I think this whole incident will be a lesson for Virat Kohli. pic.twitter.com/vj4T7alLg5
— KKR Karavan (@KkrKaravan) May 9, 2023
Gautam Gambhir calling Naveen-ul-Haq after Virat Kohli’s dismissal pic.twitter.com/DoJgMp3lEY
— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) May 9, 2023