कष्टाचं फळ मिळणार, यशस्वीला लवकर टीम इंडियात स्थान; जय शाहांकडून मिळाले संकेत
Jay Shah : राजस्थानचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल सध्या भन्नाट फॉर्मात आहे.
KKR vs RR, IPL 2023, Yashasvi Jaiswal, Jay Shah : राजस्थानचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल सध्या भन्नाट फॉर्मात आहे. यशस्वी जयस्वालच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर राजस्थानने कोलकात्याचा दारुण पराभव केला. यशस्वी जयस्वाल याने अवघ्या १३ चेंडूत अर्धशतक झळकावत इतिहास रचलाय. यशस्वीने आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. यशस्वी जयस्वाल शतकापासून वंचित राहिला.. यशस्वी जयस्वाल याने ४७ चेंडूत नाबाद ९८ धावांची खेळी केली. १३ चौकार आणि पाच षटकार लगावत सामना एकतर्फी केला. यशस्वी जयस्वाल याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशस्वी जयस्वाल याला टीम इंडियात स्थान द्यायला हवे, असे अनेकांनी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केलेय. त्यातच जय शाह यांनी ट्वीट करत यशस्वीच्या फलंदाजीचे कौतुक केलेय. त्यांच्या ट्वीटमधून यशस्वी लवकरच टीम इंडियात स्थान मिळवेल असा अंदाज वर्तवला जातोय.
यशस्वी जयस्वाल याच्या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. विराट कोहली, हरभजन सिंह, सूर्यकुमार यादव यांच्यासह अनेक दिग्गजांनी यशस्वी जयस्वालचे कौतुक केलेय. यामध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचाही समावेश आहे. जय शाह यांनी ट्वीट करत यशस्वी जयस्वालचे कौतुक केलेय.
जय शाह यांनी ट्वीटमध्ये म्हटलेय की, युवा यशस्वी जयस्वाल याने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलेय.. ही खेळी विशेष होती.. यशस्वीने आक्रमक आणि जबाबदारीने फलंदाजी केली. यशस्वी जयस्वालचे अभिनंदन.. भविषात असाच फॉर्म काय ठेवू शकतो.. असे म्हटलेय.
पाहा जय शाह यांचे ट्वीट -
A special knock by young @ybj_19 for hitting the fastest IPL fifty. He has shown tremendous grit and passion towards his game. Congratulations on achieving history. May you continue this fine form in future. #TATAIPL2023
— Jay Shah (@JayShah) May 11, 2023
जय शाह यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर यशस्वी जयस्वाल यांच्या टीम इंडियातील चर्चा सुरु झाली आहे. तो लवकरच टीम इंडियात पदार्पण करु शकतो, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. जय शाह यांच्या ट्वीटमधूनही तसाच अर्थ निघत असल्याचे नेटकरी म्हणत आहेत..
कोलकात्याविरुद्ध 13 चेंडूत अर्धशतक झळकावलं
गुरुवारी, 11 मे रोजी यशस्वी जायस्वालनं आपल्या स्फोटक खेळीनं अनेक दिग्गजांनाही आपली दखल घ्यायला भाग पाडलं. यशस्वीची ही धमाकेदार खेळी पाहून विराटही हैराण झाला. केकेआरविरुद्ध 21 वर्षीय यशस्वीनं अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक झळकावलं. आयपीएलमधील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं.
यशस्वी जायस्वालनं या मोसमात झळकावलं शतक
आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत फक्त तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली आहे. यात यशस्वी जायस्वाल यांच्या नावाचाही समावेश आहे. यशस्वीनं मुंबई इंडियन्सविरुद्ध 124 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याचवेळी यशस्वीनं केकेआरविरुद्ध नाबाद 98 धावांची खेळी केली. यशस्वी व्यतिरिक्त वेंकटेश अय्यर आणि हॅरी ब्रूक यांनी या मोसमात शतकी खेळी केली आहे.