एक्स्प्लोर

Rishabh Pant : लाँग टर्म, लाँग टर्म म्हणत 75 ट्रायल्स झाल्या, 1108 दिवसांनी सलामीला येऊनही रिषभ फ्लॉप, इरफान पठाण नेटकऱ्यांच्या निशाण्यावर कारण...

IPL 2025 : लखनौ सुपर जायंटसनं गुजरात टायटन्सला 6 विकेटनं पराभूत केलं. लखनौच्या विजयानंतरही रिषभ पंतचा फॉर्मचा मुद्दा चर्चेत आहे.

लखनौ : लखनौ सुपर जायंटसनं गुजरात टायटन्सला 6 विकेटनं पराभूत करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. लखनौची कामगिरी जरी चांगली होत असली तरी कॅप्टन रिषभ पंतला अजूनही फलंदाजीमध्ये सूर गवसलेला नाही.  गुजरात टायटन्स विरुद्ध रिषभ पंतनं 21  धावा केल्या. रिषभ पंत तब्बल 1108 दिवसानंतर सलामीला फलंदाजीला आला मात्र अपयशी ठरला. इकडे रिषभ पंत अपयशी ठरला अन् नेटकऱ्यांच्या निशाण्यावर माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आला. 

नेमकं काय घडलं?

लखनौ सुपर जायंटसच्या फलंदाजीची सलामीची जबाबदारी यावेळी एडन मारक्रम आणि  मिशेल मार्श यांनी सांभाळली आहे. मिशेल मार्श त्याच्या मुलीची प्रकृती बरी नसल्यानं आजची मॅच खेळला नाही.  यामुळं रिषभ पंत आणि एडन मारक्रम यांनी लखनौच्या डावाची सुरुवात केली. रिषभ पंत 1108 दिवसांनंतर टी 20 मध्ये फलंदाजीला आला होता.  यापूर्वी त्यानं 2022 मध्ये नेपियरमध्ये  भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात सलामीला फलंदाजी केली होती. त्या मॅचमध्ये देखील तो 11  धावा करु शकला होता. तर, आयपीएलमध्ये रिषभ पंतनं 2016 मध्ये सलामीला फलंदाजी केली होती. रिषभ पंत यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक महागडा खेळाडू आहे. रिषभ पंतला एलएसजीनं 27 कोटी रुपये खर्च करुन संघात घेतलं होतं. त्यानं 6 मॅचमध्ये 40 धावा केल्या आहेत.  

रिषभ पंत फ्लॉप होताच इरफान पठाण निशाण्यावर

रिषभ पंत यंदाच्या आयपीएलमध्ये पाचव्यांदा फेल झाल्यानंतर  नेटकऱ्यांच्या आणि क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आला. रिषभ पंत सलामीला फलंदाजी येणार या निर्णयाचं इरफार पठाणनं स्वागत केलं होतं. रिषभ पंतच्या क्षमता पाहता टी 20 मध्ये सलामीला फलंदाजीला येणं लाँग टर्मसाठी गेम चेंजिंग पऊल असेल, असं इरफाण पठाण म्हणाला होता. मात्र, रिषभ पंत अपयशी ठरल्यानंतर इरफान पठाण टीकेचा धनी बनला. खेळाची चांगली जाण असणाऱ्या व्यक्तीची अशी कमेंट योग्य वाटत नाही. दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं लाँग टर्म, लाँग टर्म म्हणत 75 ट्रायल्स दिल्या भावानं, तिसरा नेटकरी म्हणाला रिषभ पंत टेस्ट मॅचमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. मात्र मर्यादित ओव्हरच्या सामन्यात तसं नाही. तर काही लोकांनी रिषभ फक्त मिशल मार्शच्या गैरहजेरीत ही जबाबदारी पार पाडतोय, असं म्हटलं.

लखनौचा संघ : 

निकोलस पूरन, एडन मार्क्रम, रिषभ पंत (कर्णधार, विकेटकीपर), हिम्मत सिंह, डेविड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश राठी, आकाश दीप, अवेश खान, रवि बिश्नोई 

गुजरातचा संघ : 

शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अरशद खान, राशिद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 जणांचे उमेदवारी अर्ज बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 जणांचे उमेदवारी अर्ज बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 जणांचे उमेदवारी अर्ज बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 जणांचे उमेदवारी अर्ज बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Pune Election 2026 Ravindra Dhangekar: ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी
ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी
कल्याण डोंबिवलीत भाजपची हॅट्रिक, तिसरा विजय; बहुमताच्या आकड्यापासून अवघ्या 58 जागा दूर
कल्याण डोंबिवलीत भाजपची हॅट्रिक, तिसरा विजय; बहुमताच्या आकड्यापासून अवघ्या 58 जागा दूर
Embed widget