IPL 2024 : ऑरेंज कॅप अभिषेक शर्माच्या टप्प्यात, मोहित शर्माचा पर्पल कॅपवर कब्जा
IPL 2024 : आयपीएलच्या प्रत्येक हंगामात प्रत्येक खेळाडू ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप मिळवण्यासाठी जिवाचं रान करतो.
Orange And Purple Cap In IPL 2024 : आयपीएलच्या प्रत्येक हंगामात प्रत्येक खेळाडू ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप मिळवण्यासाठी जिवाचं रान करतो. मैदानात उतरणारे 11 खेळाडू प्रत्येक सामन्यात शानदार कामगिरी करतात, तेव्हा एखादा संघ चषकावर नाव कोरले. पण सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. यंदाच्या हंगामातही ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी खेळाडूंमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अभिषेक शर्माने चेन्नईविरोधात शानदार फलंदाजी करत ऑरेंज कॅपच्या दिशेने पावलं टाकली आहेत.
अभिषेक शर्माच्या टप्प्यात ऑरेंज कॅप -
रनमशीन विराट कोहलीकडे सध्या ऑरेंज कॅप आहे. आतापर्यंत विराट कोहलीने सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. कोहलीने 4 सामन्यात 203 धावा चोपल्या आहेत. पण अभिषेक शर्माकडून विराट कोहलीला तगडी टक्कर दिली जातेय. अभिषेक शर्माच्या नावावर 161 धावा आहेत. तो पाचव्या क्रमांकावर पोहचलाय. ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत राजस्थानचा रियान पराग दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याच्या नावावर तीन सामन्यात 181 धावा आहेत. आज विराट कोहली आणि रियान पराग आमनेसामने असतील.
ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर हैदराबादचा हेनरिक क्लासेन आहे. क्लासेन याने 4 सामन्यात 177 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या शुभमन गिल याने 4 सामन्यात 164 धावा जमवल्या आहेत.
पर्पल कॅप मोहित शर्माच्या डोक्यावर, स्पर्धेत कोण कोण ?
पर्पल कॅपच्या स्पर्धेत गुजरातचा मोहित शर्मा आघाडीवर आहे. मोहित शर्माने आतापर्यंत 4 सामन्यात 18.71 च्या सरासरीने सात विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनमीही फक्त 8.18 इतका कमी आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर चेन्नईचा मुस्तफिजुर रहमान आहे. मुस्तफिजुरने तीन सामन्यात 15.14 च्या सरासरीने 7 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या इकॉनमी 8.38 इतका आहे.
पर्पल कॅपच्या स्पर्धेमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव याचाही कर्मांक लागतो. मयंकने दोन सामन्यात 6.82 च्या शानदार सरासरीने सहा विकेट घेतल्या आहेत, तो तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. चौथ्या क्रमांकावर राजस्थानचा युजवेंद्र चहल आहे. युजवेंद्र चहलने 9.16 च्या सरासरीने 6 विकेट घेतल्या आहेत. आज चहल आरसीबीविरोधात मैदानात उतरणार आहे. दोन विकेट घेताच चहल पर्पल कॅपवर कब्जा करेल. पर्पल कॅपच्या स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर दिल्लीचा खलील अहमद आहे, त्याने 21.83 च्या सरासरीने 6 विकेट घेतल्या आहेत.
IPL पॉईंट टेबल
क्रमांक | संघाचे नाव | सामने | विजय | टाय | पराभव | गुण |
नेटरनरेट |
---|---|---|---|---|---|---|---|
1. |
कोलकाता
KKR
|
3 | 3 | 0 | 0 | 6 | 2.518 |
2. |
राजस्थान
RR
|
3 | 3 | 0 | 0 | 6 | 1.249 |
3. |
चेन्नई
CSK
|
4 | 2 | 0 | 2 | 4 | 0.517 |
4. |
लखनौ
LSG
|
3 | 2 | 0 | 1 | 4 | 0.483 |
5. |
हैदराबाद
SRH
|
4 | 2 | 0 | 2 | 4 | 0.409 |
6. |
पंजाब
PBKS
|
4 | 2 | 0 | 2 | 4 | -0.220 |
7. |
गुजरात
GT
|
4 | 2 | 0 | 2 | 4 | -0.580 |
8. |
आरसीबी
RCB
|
4 | 1 | 0 | 3 | 2 | -0.876 |
9. |
दिल्ली
DC
|
4 | 1 | 0 | 3 | 2 | -1.347 |
10. |
MI
|
3 | 0 | 0 | 3 | 0 | -1.423 |