एक्स्प्लोर

IPL 2023 Auction Live: लिलाव संपला, 80 खेळाडूंवर 167 कोटी खर्च; आता प्रतिक्षा आयपीएल सामन्यांची

IPL 2023 Mini Auction: आगामी आयपीएल अर्थात आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामासाठी मिनी ऑक्शन (IPL 2023 Mini Auction) पार पडणार असून काही महत्त्वाचे बदल यावेळी पाहायला मिळू शकतात.

LIVE

Key Events
IPL 2023 Auction Live: लिलाव संपला, 80 खेळाडूंवर 167 कोटी खर्च; आता प्रतिक्षा आयपीएल सामन्यांची

Background

IPL Mini Auction 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी लिलाव आज (23 डिसेंबर) कोची येथे पार पडणार आहे. या ऑक्शनमध्ये एकूण 991 खेळाडूंनी नोंदणी केली. त्यापैकी बोर्डानं 405 खेळाडूंचं नाव शॉर्टलिस्ट केली आहे. पण सर्व संघामध्ये मिळून 87 खेळाडूंची जागा शिल्लक असल्यानं 405 पैकी 87 खेळाडूंना संधी मिळणार आहे. दरम्यान या मिनी ऑक्शनसाठी नोंदणी केलेल्या 991 खेळाडूंपैकी 714 भारतीय तर 227 विदेशी खेळाडू होते. ज्यानंतर 991 खेळाडूंपैकी 10 फ्रेंचायझींनी 369 खेळाडूंना ऑक्शनसाठी निवडले. याशिवाय, अन्य 36 खेळाडूंचा ऑक्शनमध्ये समावेश करण्याची विनंती करण्यात आली. अशाप्रकारे आता एकूण 405 खेळाडूंचा मिनी ऑक्शनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

405 खेळाडूंपैकी 273 भारतीय आणि 132 परदेशी खेळाडू आहेत. परदेशी खेळाडूंमध्ये 4 खेळाडू असोसिएट देशांचे देखील आहेत. या 405 खेळाडूंपैकी एकूण 119 खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. उर्वरित 282 खेळाडू अनकॅप्ड आहेत. या खेळाडूंमध्ये 19 खेळाडू हे स्टार खेळाडू असून त्यांची बेस प्राईस 2 कोटी आहे. हे सर्व खेळाडू परदेशी आहेत. तर 11 खेळाडूंची बेस प्राईस 1.5 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय, 20 खेळाडूंची बेस प्राईस एक कोटी देखील आहे. दरम्यान ऑक्शनसाठी खेळाडूंना वेगवेगळ्या गटात ठेवलं जाणार आहे. ब्रेस पाईज आणि खेळाडूंच्या स्कीलच्या आधारावर गट तयार केलं जातं. ज्यात गोलंदाज, स्पिनर्स, ऑलराऊंडर्स, फलंदाज आणि विकेटकिपर यांचा गट तयार केला जातो. याशिवाय, कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूंचाही गट तयार केला जातो.

कोणत्या संघाकडं किती रक्कम शिल्लक?

1) सनरायजर्स हैदराबाद
सनराइजर्स हैदराबादने केन विल्यमसनसह एकूण 12 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे आगामी आयपीएल 2023 च्या लिलावावेळी त्यांच्याकडे सर्वाधिक म्हणजेच 42.25 कोटी असणार आहेत. एकूण 12 खेळाडूंना त्यांनी रिलीज केलं आहे.

2) पंजाब किंग्स
दुसरीकडे पंजाब संघाने एकूण 10 संघाला रिलीज केलं आहे. यानंतर संघाकडे एकूण 3 परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक आहेत. आता टीमकडे एकूण 7.05 कोटी पर्समध्ये शिल्लक आहेत. हा पैसा त्यांना मिनी लिलावात वापरता येणार आहे.

3) लखनौ सुपरजायंट्स
मागील वर्षी उपांत्य फेरीत पोहोचलेल्या लखनौ सुपर जायंट्सने यावेळी काही खेळाडूंना सोडले असून त्यांची एकूण पर्स व्हॅल्यू 23.35 कोटी इतकी झाली आहे. संघात एकूण 4 विदेशी खेळाडूंचे स्थान शिल्लक आहे.

4) मुंबई इंडियन्स
आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबईने अत्यंत खराब कामगिरी केली. त्यामुळे आता आगामी हंगामापूर्वी (IPL 2023) मुंबईने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. लिलावापूर्वी मुंबईने संघातील एकूण 13 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे मिनी ऑक्शनमध्ये मुंबईकडे 20.55 कोटी रुपये शिल्लक असणार आहेत.

5) चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई संघाने ख्रिस जॉर्डन आणि अॅडम मिल्नेसारखे खेळाडू सोडले आहेत. आता टीमकडे एकूण 20.45 कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे. त्याच वेळी, संघाकडे एकूण 2 परदेशी खेळाडूंचे स्लॉट शिल्लक आहेत.

6) दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्सने शार्दुल ठाकुरला केकेआरला ट्रेड केलं आहे. ज्यानंतर त्यांच्याकडे 19.45 कोटी इतके रुपये शिल्लक आहेत. तर 2 परदेशी खेळाडूंचे स्लॉट शिल्लक आहेत.

7) गुजरात टायटन्स
आयपीएल 2022 जिंकणाऱ्या गुजरात टायटन्सने लॉकी फर्ग्यूसन आणि रहमनुल्ला गुरबाज यांना ट्रेड केलं आहे. ज्यानंतर टीमकडे एकूण 19.25 कोटी रुपए शिल्लक आहेत. तर 3 परदेशी खेळाडूंचे स्लॉट शिल्लक आहेत.

8) राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्स संघाकडे खेळाडूंना रिलीज केल्यावर 13.20 कोटी इतकी पर्स वॅल्यू असून 4 परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक आहे.

9) रॉयल चँलेंजर्स बंगळुरु
रॉयल चँलेंजर्स बंगळुरुकडे 8.75 कोटी रुपये शिल्लक असून 3 परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक आहे.

10) कोलकाता नाईट रायडर्स
केकेआरने लॉकी फोर्ग्युसन, शार्दुल ठाकूर आणि रहमानउल्ला गुरबाज यांचा ट्रेडद्वारे संघात समावेश केला आहे. यानंतर, संघाकडे 7.05 कोटी रुपये शिल्लक आहेत, जे सर्व संघांमध्ये सर्वात कमी आहे. त्याचबरोबर संघात 3 विदेशी खेळाडूंचे स्लॉटही उपलब्ध आहेत. 

हे देखील वाचा-

21:24 PM (IST)  •  23 Dec 2022

IPL 2023 Acution Live Updates : 80 खेळाडू मालामाल, 10 संघांनी खर्च केले 167 कोटी

आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी कोची येथे लिलाव पार पडला. तब्बल सहा तास चाललेल्या या लिलावात 10 संघांनी 167 कोटी रुपये खर्च केले. या लिलावाचं वैशिष्ट्य म्हणजे अष्टपैलू खेळाडू. सॅम करन, बेन स्टोक्स, कॅमरुन ग्रीन यांना सर्वाधिक बोली लागली. तर अमित मिश्रा सर्वात जास्त वयाचा खेळाडू ठरला. या लिलावात 80 खेळाडू मालामाल झाले आहेत. 

20:41 PM (IST)  •  23 Dec 2022

IPL 2023 Acution Live Updates : लिटन दासला केकेआरनं 50 लाखाला घेतलं विकत

बांगलादेशचा स्टार खेळाडू लिटन दास याला 50 लाख रुपयांना कोलकाता नाईट रायडर्स संघानं विकत घेतलं आहे.

19:41 PM (IST)  •  23 Dec 2022

IPL 2023 Acution Live Updates : जोशुवा लिटीलला 4.4 कोटींना गुजरातनं घेतलं विकत

जोशुवा लिटीलला 4.4 कोटींना गुजरातनं विकत घेतलं असून आयपीएलमध्ये विकत घेण्यात आलेला तो पहिला आयर्लंडचा खेळाडू ठरला आहे.

19:07 PM (IST)  •  23 Dec 2022

IPL 2023 Acution Live Updates : कायल जॅमिसन चेन्नईकडे

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायल जॅमिसन याला 1 कोटींच्या बेस प्राईसला चेन्नई सुपरकिंग्सने विकत घेतलं आहे. 

18:00 PM (IST)  •  23 Dec 2022

IPL 2023 Acution Live Updates : शिवम मावी ठरला सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू

यंदाच्या ऑक्शनमध्ये अष्टपैलू शिवम मावी हा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला असून त्याला गुजरात टायटन्सने 6 कोटींना विकत घेतलं आहे. तर मुकेश कुमारला दिल्लीने 5.50 कोटींना घेतलं आहे. याशिवाय विव्रत शर्माला 2.60 कोटींना सनरायजर्स हैदराबादने, केएस भरतला 1.20 कोटींना गुजरात टायटन्सने तर एन जगदीशनला 90 लाखांना कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतलं आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget