एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IPL 2025 : 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारणाऱ्या प्रियांशसाठी संघांमध्ये स्पर्धा, अखेर पंजाबनं बाजी मारली, युवा खेळाडू बनला करोडपती

IPL 2025 : आयपीएलच्या 2025 साठीचं मेगा ऑक्शन पार पडलं आहे. अनेक युवा खेळाडूंना विविध संघांनी चांगली रक्कम देत खरेदी केलं आहे.

Priyansh Arya IPL Mega Auction जेद्दाह : 2025 च्या आयपीएलसाठी  सुरु असलेलं मेगा ऑक्शन संपलं आहे. ऑक्शनमध्ये अनेक युवा खेळाडूंना चांगली रक्कम मिळाली आहे. या खेळाडूंमध्ये  प्रियांश आर्या या नावाचा समावेश आहे. प्रियांश आर्यानं दिल्ली टी 20 प्रीमियर लीगमध्ये एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले होते, त्यामुळं चर्चेत आला होता. प्रियांश आर्याचं नाव मेगा ऑक्शनमध्ये 30 लाख रुपये मूळ किंमत असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत होतं. 

दिल्ली कॅपिटल्सनं सुरुवातीला पहिली बोली प्रियांश आर्याच्या नावासाठी लावली. दिल्लीला त्यांच्या संघात एक स्थानिक खेळाडू हवा होता. दिल्लीसोबत मुंबई इंडियन्सनं प्रियांश आर्यासाठी बोली लावली. त्यानंतर पंजाब किंग्जनं देखील बोली लावली.

प्रियांश आर्याच्या नावावर बोली लावण्यासाठी संघांमध्ये स्पर्धा लावली. 30 लाख रुपयांची बोली एक कोटींचा आकडा पार करुन पुढं गेली. यानंतर आरसीबीनं प्रियांश आर्यासाठी बोली लावली. आरसीबीनं  प्रियांशसाठी 1.4 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. पंजाब किंग्जनं 1.5 कोटी रुपयांची बोली लावली. यानंतरही प्रियांश आर्याला संघात घेण्यासाठी संघांमध्ये स्पर्धा सुरु होती. 

लिलाव सुरु असताना एकदा स्थिती अशी आली की आरसीबी प्रियांश आर्याला आपल्या संघात घेणार, मात्र त्याचवेळी पंजाब किंग्जनं पुन्हा बोली लावली. प्रियांश आर्याला 3 कोटी 80 लाख रुपयांना पंजाब किंग्जनं खरेदी करुन संघात स्थान दिलं. 

प्रियांश आर्यानं काही दिवसांपूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतक केलं होतं. दिल्ली आणि पंजाब दरम्यानच्या मॅचमध्ये 43 बॉलमध्ये 102 धावांची खेळी केली. उत्तर प्रदेशच्या संघात भुवनेश्वर कुमार, शिवम वामी आणि पीयूष चावला या सारखे दिग्गज खेळाडू होते. मात्र, तरी देखील प्रियांश आर्यानं आक्रकम फलंदाजी कायम ठेवली होती. प्रियांश आर्यानं वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीचा देखील चांगला सामना केला होता. आर अश्विननं त्याच्या यूट्यूब शोमध्ये प्रियांश आर्याचं कौतुक  केलं होतं.

आयपीएलचं मेगा ऑक्शन संपलं

जेद्दाहमध्ये दोन दिवसांपासून सुरु असलेलं मेगा ऑक्शन संपलं आहे. टीम इंडियाचा आक्रमक खेळाडू यष्टीरक्षक रिषभ पंतला 27 कोटी रुपये खर्च करुन लखनौ सुपर जाएंटसनं संघात स्थान दिलं. तर, दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सला 2024 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरला  पंजाब किंग्जनं 26.75 कोटी रुपये खर्च करुन संघात स्थान दिलं होतं.  यानंतर पंजाबनं अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल या दोघांना देखील प्रत्येकी 18 कोटी रुपये खर्च करुन संघात स्थान दिलं आहे.

इतर बातम्या : 

मुंबई इंडियन्सची संपूर्ण टीम तयार, 2025 च्या आयपीएलसाठी कसा असेल संघ?  हार्दिक पांड्याच्या टीममध्ये कोण? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP MajhaZero Hour Shital Mhatre | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही कोणाची इच्छा? ABP MajhaZero Hour | महाराष्ट्राचा पुढच्या मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवा भाऊ? ABP MajhaJob Majha | कोल इंडिया लिमिटेडमध्ये मायनिंग पदासाठी 236 जागांवर भरती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Embed widget