(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2025 Mumbai: मुंबई इंडियन्सची संपूर्ण टीम तयार, 2025 च्या आयपीएलसाठी कसा असेल संघ? हार्दिक पांड्याच्या टीममध्ये कोण?
IPL 2025 Mega Auction: मुंबई इंडियन्सनं रिटेन्शननं नंतर मेगा ऑक्शनमध्ये कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. 2025 च्या आयपीएलसाठी मुंबईची टीम जवळपास निश्चित झाली आहे.
IPL 2025 Mega Auction जेद्दाह : मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये कोठ्यवधी रुपये खर्च केले आहेत. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा यांना रिटेन केलं होतं. मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सनं ट्रेंट बोल्ट 12.50 कोटी रुपये खर्च करुन संघात स्थान दिलं आहे. मुंबई इंडियन्सची संपूर्ण टीम तयार झाली आहे. मुंबईनं रिटेन्शननंतर ऑक्शनमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला आहे. मुंबईनं दीपक चाहर, विल जॅक्स आणि नमन धीरला मेगा ऑक्शनमध्ये खरेदी केलं आहे.
मुंबई इंडियन्सनं भारतासह न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना खरेदी केलं. मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये या सर्व खेळाडूंना स्थान मिळू शकतं. रोहित शर्मा आणि विल जॅक्स मुंबईच्या डावाची सुरुवात करु शकतात. विल जॅक्स आक्रमक फलंदाज असून आयपीएलमध्ये त्याच्या नावावर शतकाची नोंद आहे.
मुंबईकडून तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी नमन धीर आणि तिलक वर्मा यापैकी एकाला संधी मिळू शकते. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे या संघाचे प्रमुख शिलेदार आहेत. हार्दिक पांड्या मुंबईचा कॅप्टन आहे. रेयान रिकल्टनला विकेटकीपर फलंदाज म्हून संघात स्थान मिळेल. मुंबईच्या गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि मिचल सँटनर सांभाळतील.
मुंबईनं ऑक्शनमध्ये ट्रेंट बोल्टसाठी सर्वाधिक रक्कम मोजली. दीपक चाहरला देखील चांगली रक्कम देत संघात स्थान देण्यात आलं.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन - रोहित शर्मा, विल जॅक्स, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रेयान रिकल्टन, मिचल सँटनर, दीपक चाहर, अल्लाह गजनफर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर आणि ट्रेंट बोल्ट
मुंबईनं मेगा ऑक्शनमध्ये सर्वाधिक रक्कम कुणासाठी मोजली?
ट्रेंट बोल्ट - न्यूझीलंड - 12.50 कोटी रुपये
दीपक चाहर - भारत - 9.25 कोटी रुपये
विल जॅक्स - इंग्लंड - 5.25 कोटी रुपये
नमन धीर - भारत - 5.25 कोटी रुपये
अल्लाह गजनफर - अफगानिस्तान - 4.80 कोटी रुपये
#MumbaiIndians live up to their slogan 'Duniya Hila Denge Hum', with this powerhouse squad! 🥶
— Star Sports (@StarSportsIndia) November 25, 2024
Ready, Set, Go, #MIFans 💙 for #TATAIPL2025!#TATAIPLAuction #IPLAuctionOnJioStar pic.twitter.com/jacg9BYVZC
मुंबई इंडियन्स 2025 मध्ये कामगिरी सुधारणार?
मुंबई इंडियन्सची कामगिरी गेल्या हंगामात निराशाजनक राहिलेली आहे. मुंबई इंडियन्सनं 2024 च्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याकडे नेतृत्त्व सोपवलं मात्र तरी देखील मुंबईची कामगिरी सुधारली नव्हती. मुंबईचा संघ 2024 च्या आयपीएलमध्ये गुणतालिकेत तळाला राहिला. मुंबई इंडियन्स 2025 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावणार का याकडे देखील सर्वाचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या :