IPL 2022: पंजाबच्या कर्णधारपदी 'या' खेळाडूचं नाव चर्चेत, आकाश चोप्राही म्हणतोय...
IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी (IPL) पंजाब किंग्सनं (Punjab Kings) अद्याप आपल्या कर्णधाराची घोषणा केलेली नाही.
IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी (IPL) पंजाब किंग्सनं (Punjab Kings) अद्याप आपल्या कर्णधाराची घोषणा केलेली नाही. पंजाबच्या संघानं फलंदाज मयांक अग्रवाल आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह यांना रिटेन केलंय. परंतु, या दोघांपैकी कोणत्याही खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबादारी सोपवली नाही. यामुळं आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction) पंजाबचा संघ कर्णधार शोधण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं पंजाबच्या संघाला महत्वाचा सल्ला दिलाय. तसेच पंजाबच्या संघानं कोणत्या खेळाडूकडं कर्णधारपदं सोपवावं? यावर त्यांनी भाष्य केलंय.
पंजाब किंग्जनं रिटेन मयांक अग्रवालला संघाचा कर्णधार बनवावा, असं आकाश चोप्रानं म्हटलंय. "आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये पंजाबच्या संघाला कर्णधार म्हणून कोणत्या खेळाडूला खरेदी करण्याची गरज नाही. त्यांनी संघाचा आक्रमक फलंदाज मंयक अग्रवालची संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करावी. कोणत्याही खेळाडूला नव्या संघाचं नेतृत्व करणं थोडं अवघड जातं."
पंजाबच्या संघानं मंयक अग्रवालला 12 कोटी आणि अर्शदीप सिंहला 4 कोटीत रिटेन केलंय. तर, या संघाचा माजी कर्णधार केएल राहुल लखनऊ फ्रँचायझीमध्ये सामील झालाय. सद्या पंजाबच्या संघाकडं 72 कोटी शिल्लक आहे. जे इतर फ्रँचायझीपेक्षा सर्वाधिक आहे. यावर आकाश चोप्रा म्हणाला की, "पंजाब सर्वाधिक पैसे घेऊन मेगा ऑक्शनमध्ये उतरणार आहे. ही त्यांच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट असेल. मात्र, यानंतरही पंजाब चांगला संघ बनवू शकतो की नाही? हे त्यांच्यावर अवलंबून असेल."
हे देखील वाचा-
- IND vs WI : भारत-वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना; इतिहास घडवण्याची टीम इंडियाला संधी
- IPL auction 2022 : आयपीएल लिलावात 'या' 8 भारतीय फलंदाजांवर असेल सर्वांची नजर
- IPL auction 2022 : कोणत्या संघाच्या ताफ्यात कोणते शिलेदार? कुणाच्या बटव्यात किती रक्कम शिल्लक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha