एक्स्प्लोर

IPL auction 2022 : आयपीएल लिलावात 'या' 8 भारतीय फलंदाजांवर असेल सर्वांची नजर

IPL Auction 2022 : आयपीएलच्या आगामी हंगामासाठीचा महालिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.

IPL Auction 2022 : आयपीएल 2022 (IPl 2022) ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सामन्यांना काही महिने शिल्लक असले तरी आता महालिलावामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. यंदा आयपीएलमध्ये आठ जागी 10 संघ खेळणार आहेत. नव्या आलेल्या संघासह जुन्या संघानी आपआपले तीन ते चार खेळाडू रिटेन केले असून आता इतर संघ पूर्ण करण्यासाठी महालिलाव पार पडणार आहे. येत्या 12- 13 फेब्रुवारीदरम्यान आयपीएलचा हा मेगा ऑक्शनचा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान यामध्ये नेमकं कोणत्या आठ भारतीय फलंदाजांवर संघाचं लक्ष असेल यावर एक नजर फिरवूया...

  1. शिखर धवन - मागील वर्षीपर्यंत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणारा शिखर धवनला यंदा दिल्लीने रिटेन केलेलं नाही. त्यामुळे शिखरसारखा अनुभवी डावखुरा फलंदाज घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील.
  2. इशान किशन - शिखरनंतर आणखी एक डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक इशान किशनवर अनेकांच्या नजरा असणार आहेत. पण मुंबई इंडियन्सच त्याला पुन्हा संघात घेईल अशी दाट शक्यता आहे.
  3. देवदत्त पडीकल - आणखी एक डावखुरा सलामीवीर देवदत पडीकलला यंदा आरसीबीने रिटेन केलं नसल्याने त्याला घेण्यासाठीही मोठी बोली लागू शकते.
  4. श्रेयस अय्यर - कर्णधारपदाचा दावेदार असणारा श्रेयस अय्यरला यंदा कोणता संघ घेईल? आणि त्याला कर्णधारपद मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर लिलावातूनच समोर येईल.
  5. शाहरुख खान - पंजाब संघाकडून आयपीएल 2021 मध्ये सामन्यांमध्ये काही हटके खेळी करणाऱ्या शाहरुख खानलाही आगामी आयपीएलमध्ये घेण्यासाठी सर्व संघ उत्सुक असतील  
  6. राहुल त्रिपाठी - केकेआरचा एक विश्वासू फलंदाज राहुल त्रिपाठीला केकेआरने रिटेन न केल्यामुळे त्याला घेण्याकरता मोठी बोली लागू शकते. पण केकेआर त्याला पुन्हा घेण्याची दाट शक्यता आहे.
  7. नितीश राणा - केकेआरचा आणखी एक फलंदाज जो गरज पडल्यास गोलंदाजीही करु शकतो, अशा नितीश राणावर या हंगामात मोठी बोली लागू शकते.
  8. रॉबीन उथप्पा - या यादीत शेवटचं नाव म्हणजे अनुभवी भारतीय फलंदाज रॉबीन उथप्पा. 2007 विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील रॉबीन मागील आयपीएल चेन्नईकडून खेळला होता. त्याला यंदाच्या आयपीएलमध्येही घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील. 

कोणत्या फ्रँचाईझीच्या ताफ्यात कोणते शिलेदार? फ्रँचाईझींच्या बटव्यात किती रक्कम आणि किती खेळाडूंची गरज

चेन्नई सुपर किंग्स
बिनीचे शिलेदार – रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी)
बटव्यातली शिल्लक – 48 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7

दिल्ली कॅपिटल्स
बिनीचे शिलेदार– रिषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी) आणि एनरिच नॉकिया (6.5 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 47.5 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7

कोलकाता नाईट रायडर्स
बिनीचे शिलेदार– आंद्रे रसेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), वेंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी)
बटव्यातली शिल्लक – 48 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 6

लखनौ सुपर जायंटस
बिनीचे शिलेदार– लोकेश राहुल (17 कोटी), मार्कस स्टॉईनिस (9.2 कोटी), रवी बिष्णोई (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 59 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7             

मुंबई इंडियन्स
बिनीचे शिलेदार– रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमरा (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 48 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7

पंजाब किंग्स
बिनीचे शिलेदार– मयांक अगरवाल (12 कोटी), अर्शदीपसिंग (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 72 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 23, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 8

राजस्थान रॉयल्स
बिनीचे शिलेदार– संजू सॅमसन (14 कोटी), जोस बटलर (10 कोटी) यशस्वी जैस्वाल (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 62 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
बिनीचे शिलेदार– विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी), मोहम्मद सिराज (7 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 57 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7

सनरायझर्स हैदराबाद
बिनीचे शिलेदार– केन विल्यमसन (14 कोटी), अब्दुल समद (4 कोटी), उमरान मलिक (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक – 68 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7

गुजरात टायटन्स
बिनीचे शिलेदार– हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (आठ कोटी)
बटव्यातली शिल्लक – 52 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट साडपलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट साडपलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट साडपलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट साडपलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
Embed widget