एक्स्प्लोर

MS Dhoni IPL 2026 : थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ

CSK MS Dhoni IPL 2026 : यंदा आयपीएल 2026 चा (Indian Premier League) थरार 28 मार्चपासून सुरू होणार आहे.

MS Dhoni Preparing Bat IPL 2026 : यंदा आयपीएल 2026 चा (Indian Premier League) थरार 28 मार्चपासून सुरू होणार आहे. या हंगामातील पहिला सामना ब्लॉकबस्टर ठरण्याची शक्यता असून त्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने भिडणार आहेत. तर पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. गेल्या हंगामात राजस्थानचे नेतृत्व करणारा संजू सॅमसन (Sanju Samson) यंदा चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. दुसरीकडे दीर्घकाळ सीएसकेचा भाग असलेला रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून मैदानात उतरणार आहे.

MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन्... 

मात्र चाहत्यांच्या नजरा सर्वाधिक माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) वर असतील. अनेकांचा अंदाज आहे की हा धोनीचा आयपीएलमधील शेवटचा हंगाम ठरू शकतो. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा थालाकडून षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी ग्राइंडरच्या मदतीने स्वतःचा बॅट घासत असल्याचे दिसते. सीएसकेने हा व्हिडिओ शेअर करत “Master of the Craft” असे कॅप्शन दिले आहे.

धोनीशिवाय CSK ची कल्पनाही नाही... - इरफान पठाण

भारतीय संघाचा माजी ऑलराउंडर इरफान पठाण (Irfan Pathan) म्हटला की, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सची कल्पनाही धोनीशिवाय करता येत नाही. मात्र धोनी कदाचित आपला शेवटचा हंगाम खेळण्याच्या तयारीत असू शकतात. जिओहॉटस्टारवर बोलताना पठाण म्हणाला, “धोनीशिवाय सीएसके आणि आयपीएलची कल्पना करणे कठीण आहे. आता त्याची भूमिका संघाला एकत्र ठेवण्याची असेल. तसेच ते संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांना फ्रँचायझीच्या भविष्यातील नेतृत्वासाठी तयार करण्यात मदत करतील.”

पठाण पुढे म्हणाला की, धोनी किती सामने खेळणार हे निश्चित नाही, पण ड्रेसिंग रूममधील त्याची उपस्थिती संघासाठी खूप महत्त्वाची ठरेल. संजू सॅमसनलाही त्याचा फायदा होईल. ऋतुराज गायकवाड आधीच कर्णधार आहेत, त्यामुळे भविष्यासाठी दोन-तीन खेळाडूंना तयार करण्याचे काम सुरू आहे.

CSK ची ‘परफेक्ट फेअरवेल’ची तयारी...

पठाणच्या मते, सीएसके व्यवस्थापन या हंगामात काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करेल. धोनीची फिटनेस, त्याची फलंदाजीची जागा आणि तो सर्व सामने खेळणार का याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र याचे उत्तर सीएसके व्यवस्थापनच देऊ शकते. सीएसकेला यंदा सहावे आयपीएल विजेतेपद जिंकून धोनीला भव्य निरोप द्यायचा आहे. दरम्यान, फ्रँचायझीचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले की धोनी सर्व सामने खेळतील, पण त्यांची भूमिका संघ व्यवस्थापन ठरवेल.

धोनी आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून या लीगमध्ये खेळत आहेत आणि सीएसकेच्या पिवळ्या जर्सीची ओळख बनला आहे. तो आता आपला 19वा आयपीएल हंगाम खेळण्यासाठी सज्ज आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. वैयक्तिक कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, धोनीने 278 सामन्यांत 5439 धावा केल्या आहेत. विकेटकीपर म्हणून त्याने 158 झेल घेतले असून 47 स्टंपिंगही केले आहे. 

हे ही वाचा -

Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget