एक्स्प्लोर

IND vs WI : भारत-वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना; इतिहास घडवण्याची टीम इंडियाला संधी

India vs West Indies 3rd ODI Playing XI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी होणार आहे.

India vs West Indies 3rd ODI Playing XI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना शुक्रवारी, 11 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. दुपारी दीड वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येईल. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवलेली रोहित ब्रिगेड तिसरा सामनाही खिशात घालून वेस्ट इंडिजचा सूपडा साफ करण्याच्या तयारीत आहेत. तसेच पाहुणा संघ वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना जिंकून क्लिन स्वॅपपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात असेल. 

ही मालिका सुरू होण्यापूर्वी सलामीवीर शिखर धवनसह चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र, आता धवनच्या पुनरागमनानंतर विजयी संघाचं संयोजन बदललं जाऊ शकतं. त्याच्या अनुपस्थितीत इशान किशनने पहिल्या सामन्यात तर ऋषभ पंतने दुसऱ्या सामन्यात डावाची सुरुवात केली होती.

दुसऱ्या सामन्यात 44 धावांनी मिळवलेल्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मानं धवन शेवटचा सामना खेळणार असल्याचं सांगितलं होतं. तो म्हणाला होता, 'शिखर पुढचा सामना खेळेल. गोष्ट नेहमीच परिणामाबद्दलची नसते. त्यानं मैदानावर वेळ घालवायला हवा." याचा अर्थ उपकर्णधार केएल राहुल पुन्हा मधल्या फळीत मैदानावर उतरेल. कर्णाधार रोहित गेल्या सामन्यात फारशी चांगली खेळी करु शकला नाही, पण तो आणि धवन चांगल्या स्थितीत असल्यास कोणत्याही गोलंदाजाच्या आक्रमणाचा पर्दाफाश करू शकतात. ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव मधल्या फळीत उतरतील. सूर्यकुमारने गेल्या सामन्यात 64 धावा करून तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपलं स्थान पक्कं केलं आहे. 

टीम इंडियाचा संभाव्य संघ 

शिखर धवन, रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, दीपक हूडा, दीपक चाहर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान

भारताविरुद्ध वेस्टइंडिजचं खराब प्रदर्शन

भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. वेस्ट इंडीजला भारताविरुद्ध खेळण्यात आलेल्या सलग 11 एकदिवसीय मालिका गमवाव्या लागल्या आहेत. 2007 पासून वेस्ट इंडीजला भारताविरुद्ध एकही मालिका जिंकता आली नाही. वेस्ट इंडीजच्या संघानं भारताला अखेर 2006 मध्ये त्यांच्या मायदेशात 4-1 नं पराभूत केलं होतं.

एका संघाविरुद्ध सर्वाधिक मालिकेचा जिंकण्याचा विक्रम

एका संघात सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. त्यानंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा पाकिस्तान आहे. पाकिस्ताननं 1999 के 2017 पर्यंत वेस्ट इंडीजच्या संघाला सलग 9 मालिकेत धूळ चाखली आहे. चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचे नाव आहे. दक्षिण आफ्रिकेनं झिम्बाब्वेविरुद्ध 1995-2018 दरम्यान सलग 9 एकदिवसीय मालिका जिंकली आहे. भारतीय संघाचे नाव पुन्हा पाचव्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने 2007 ते 2021 दरम्यान सलग 9 वनडे मालिकेत श्रीलंकेचा पराभव केला आहे.

IND vs WI : भारत-वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना; इतिहास घडवण्याची टीम इंडियाला संधी

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IND vs WI 3rd ODI : रोहित-धवन करणार ओपनिंग, तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला अशी असेल Playing 11

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Embed widget