IPL auction 2022 : कोणत्या संघाच्या ताफ्यात कोणते शिलेदार? कुणाच्या बटव्यात किती रक्कम शिल्लक
IPL auction 2022 : आयपीएलच्या रणांगणात यंदा लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या फौजा दाखल झाल्या असून, त्यामुळं आयपीएलच्या आगामी म्हणजे पंधराव्या मोसमापासून दहा फ्रँचाईझी विजेतेपदाच्या शर्यतीत असतील.
![IPL auction 2022 : कोणत्या संघाच्या ताफ्यात कोणते शिलेदार? कुणाच्या बटव्यात किती रक्कम शिल्लक Purse remaining of all 10 teams ahead of the IPL 2022 mega-auction IPL auction 2022 : कोणत्या संघाच्या ताफ्यात कोणते शिलेदार? कुणाच्या बटव्यात किती रक्कम शिल्लक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/02/18/eabdc89218dba1cd3350c0080281af5a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL auction 2022 : आयपीएलच्या रणांगणात यंदा लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या फौजा दाखल झाल्या असून, त्यामुळं आयपीएलच्या आगामी म्हणजे पंधराव्या मोसमापासून दहा फ्रँचाईझी विजेतेपदाच्या शर्यतीत असतील. 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूत मेगा लिलाव संपन्न होणार आहे. त्यापूर्वी जाणून घेऊयात कोणत्या संघाकडे कोणते खेळाडू आहेत. कुणाकडे किती रक्कम शिल्लक आहे.
कोणत्या फ्रँचाईझीच्या ताफ्यात कोणते शिलेदार? फ्रँचाईझींच्या बटव्यात किती रक्कम आणि किती खेळाडूंची गरज
चेन्नई सुपर किंग्स
बिनीचे शिलेदार – रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी)
बटव्यातली शिल्लक – 48 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
दिल्ली कॅपिटल्स
बिनीचे शिलेदार– रिषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी) आणि एनरिच नॉकिया (6.5 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 47.5 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
कोलकाता नाईट रायडर्स
बिनीचे शिलेदार– आंद्रे रसेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), वेंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी)
बटव्यातली शिल्लक – 48 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 6
लखनौ सुपर जायंटस
बिनीचे शिलेदार– लोकेश राहुल (17 कोटी), मार्कस स्टॉईनिस (9.2 कोटी), रवी बिष्णोई (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 59 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
मुंबई इंडियन्स
बिनीचे शिलेदार– रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमरा (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 48 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
पंजाब किंग्स
बिनीचे शिलेदार– मयांक अगरवाल (12 कोटी), अर्शदीपसिंग (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 72 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 23, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 8
राजस्थान रॉयल्स
बिनीचे शिलेदार– संजू सॅमसन (14 कोटी), जोस बटलर (10 कोटी) यशस्वी जैस्वाल (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 62 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
बिनीचे शिलेदार– विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी), मोहम्मद सिराज (7 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 57 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
सनरायझर्स हैदराबाद
बिनीचे शिलेदार– केन विल्यमसन (14 कोटी), अब्दुल समद (4 कोटी), उमरान मलिक (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक – 68 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
बिनीचे शिलेदार– हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (आठ कोटी)
बटव्यातली शिल्लक – 52 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)