एक्स्प्लोर

MS Dhoni : एका बॉलमुळं धोनीच्या हातून पहिल्या आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची संधी हुकलेली? 2008 मध्ये काय घडलेलं?

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग उद्यापासून सुरु होत आहे.धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईनं पाचवेळा विजेतेपद मिळवलं आहे. मात्र, पहिल्याच पर्वात चेन्नईनं अंतिम फेरीत धडक दिली होती.

IPL 2024 चेन्नई: भारतीय क्रिकेट बोर्डानं (BCCI)2008 मध्ये आयपीएलची सुरुवात केली होती. पहिल्या स्पर्धेसाठी ८ फ्रँचायजी तयारी करण्यात आल्या होत्या. पहिल्या आयपीएलमध्ये 8 संघ सहभागी झाले होते. लीग स्टेज, सेमी फायनल आणि फायनल अशा टप्प्यात पहिलं आयपीएल पार पडलं होतं. त्यावेळी भारतीय टीमचा कॅप्टन असलेल्या महेंद्रसिंह धोनीकडे (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) धुरा सोपवण्यात आली होती. आयपीएलचं पहिलं पर्व असल्यानं धोनीसह इतर टीमच्या सर्व कॅप्टन्सपुढं मोठं आव्हान होतं.   

चेन्नईसाठी पहिलं आयपीएल कसं होतं?

भारतानं 2007 मध्ये पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानं देशभरात टी-20 क्रिकेटची मोठी  क्रेझ होती. चेन्नईनं 2008 च्या आयपीएलमध्ये पहिला सामना किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाविरुद्ध होता. या मॅचमध्ये धोनीच्या टीमनं  33 धावांनी विजय मिळवला होता. आयपीएल स्पर्धा डबल राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवलं जातं त्यामुळं सीएसकेचे त्या आयपीएलमध्ये प्रत्येक टीमविरुद्ध दोन दोन सामने झाले होते.  

चेन्नईच्या टीमनं लीग स्टेजमध्ये 14 मॅच खेळल्या त्यामध्ये त्यांना ८ मॅचमध्ये विजय मिळाला तर ६ मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. चेन्नईनं 16 गुण मिळवत गुणतालिकेत तिसरा क्रमांक मिळवला होता.  सेमीफायनलमध्ये पुन्हा एकदा सीएसके आणि पंजाब यांच्यात लढत झाली.  यामध्ये धोनीच्या टीमनं 9 विकेटनं विजय मिळवला आणि सीएसके फायनलमध्ये गेली. 

सीएसके विरुद्ध फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ होता.चेन्नईनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 163 धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सला अखेरच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर एका रनची विजयासाठी आवश्यकता होती. राजस्थानला ती रन घेण्यात यश आलं आणि त्यांनी पहिल्या आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरलं.2008 च्या स्पर्धेत विजेतेपदापासून एक पाऊल दूर राहिल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जनं विजेतपदावर 2010 मध्ये नाव कोरलं. चेन्नईनं आतापर्यंत आयपीएलमध्ये 5 वेळा विजेतेपद मिळवलं आहे.  

चेन्नईसाठी 2008 मध्ये सर्वाधिक धावा कुणी केल्या?

चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएलच्या पहिल्याच पर्वात अंतिम फेरीपर्यंत धडक दिली होती. चेन्नईसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू सुरेश रैना ठरला होता. सुरेश रैनानं पहिल्या आयपीएलमध्ये 16 मॅचमध्ये 421 धावा केल्या होत्या. रैनाचं त्या सीझनमध्ये 142.71 इतकं स्ट्राइक रेट होतं. महेंद्रसिंह धोनीनं देखील 16 मॅचमध्ये 414 धावा केल्या होत्या.  

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जकडून पहिल्या सीझनमध्ये एल्बी मोर्केलनं सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. एल्बी मोर्केलनं १३ मॅचमध्ये 17 विकेट घेतल्या होत्या.  मनप्रीत गोनी या भारतीय गोलंदाजानं 16 मॅचमध्ये 17 विकेट घेतल्या होत्या. 

संबंधित बातम्या:

MS Dhoni : होय हे धोनीचं शेवटचं आयपीएल..., सुनंदन लेले यांचं एबीपी माझाशी बोलताना मोठं वक्तव्य

MS Dhoni : सगळं ठरलेलं होतं? चेन्नईचं नेतृत्त्व ऋतुराजकडे, धोनीनं फेसबुक पोस्टमधून दिलेले संकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Somvati Amvasya:नववर्षाचं निमित्त सोमवती अमावस्येमुळे तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दीRajkiya Shole Mohan Bhagwat : संघ विरुद्ध भाजप असं  चित्र कोण रंगवतयं?Rajkiya Shole Suresh Dhus : धसांचा तोफखाना सुरुच, बीडच्या राजकारणाला मराठा-ओबीसी असा रंग?Special Report on Nitesh Rane : केरळला पाकिस्तान म्हणणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
ISRO : नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास,  स्पॅडेक्स मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार
नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेक्स मिशनचं श्रीहरीकोटा येथून यशस्वी लाँचिंग
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
Astrology : यंदाची सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
Embed widget