एक्स्प्लोर
Gold Crush Building Ghatkopar : घाटकोपरच्या गोल्ड क्रश इमारतीला आग,अग्निशमन दल घटनास्थळी
मुंबईच्या घाटकोपर (Ghatkopar) भागातील गोल्ड क्रश (Gold Crush) या कमर्शियल इमारतीला आग लागल्याची घटना घडली असून, अग्निशमन दल (Fire Brigade) घटनास्थळी दाखल झाले आहे. 'सफोकेशनमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे,' अशी माहिती प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी दिली आहे. ही आग इमारतीच्या तळघरात लागली होती आणि तिचा धूर वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे इमारतीत कामासाठी आलेले अनेक लोक अडकून पडले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही लोकांना बाहेर काढले असून, शिड्यांच्या साहाय्याने खिडक्यांमधून लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी, बचावकार्य वेगाने सुरू आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















