एक्स्प्लोर
LaxmiPujan : लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावरून गोंधळ, 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करण्यावर जाणकारांचा भर
दिवाळीच्या (Diwali) सणाचं खरं महत्त्व उलगडताना नरेंद्र गुरुजींनी (Narendra Guruji) या पर्वाला नात्यांची आणि निसर्गपूजेची (Nature Worship) दिवाळी म्हटलं आहे. 'यम ही देवता जी आहे जी सृष्टीला संवर्धन करतं म्हणजे सृष्टीचे प्रकारचे संतुलन राखण्याची देवता आहे,' असं महत्त्वाचं विधान नरेंद्र गुरुजींनी केलं. त्यांनी स्पष्ट केलं की, धनत्रयोदशीला (Dhanatrayodashi) केले जाणारे यम दीपदान (Yama Deepdaan) हे मृत्यूच्या देवतेऐवजी निसर्गचक्र संतुलित ठेवणाऱ्या देवतेप्रती आदर व्यक्त करण्याचा विधी आहे. दिवाळीची सुरुवातच रमा एकादशीला सवत्स धेनूच्या पूजनाने होते, जे निसर्गाप्रती कृतज्ञता दर्शवते. तसेच, गोवर्धन पूजा (Govardhan Puja) ही पर्वताची, म्हणजेच पंचमहाभूतांची पूजा असून ती जीवनात संतुलन राखण्यासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















