Ajit Pawar in Satara: औंधच्या राणीसाहेबांनी म्यानातून तलवार उपसली, हवेत नाचवली, अजित पवार बघतच बसले
Ajit Pawar in Satara: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा साताऱ्याच्या औंध येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तलवार हवेत नाचवली जाताना बाजूला उभे राहिले.

Ajit Pawar in Satara: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अलीकडच्या काळात कोणताही वाद, आक्षेपार्ह वक्तव्य किंवा कृती यापासून चार हात लांब राहताना दिसतात. अनेकदा अजित पवार (Ajit Pawar) आपल्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना सबुरीने वागण्याचा सल्ला देतात. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) चमकोगिरी, दिखाऊपणा किंवा फाजीलपणा करणाऱ्या आपले नेते आणि कार्यकर्त्यांना ते अनेकदा झापतानाही दिसून आले आहेत. मात्र, शनिवारी साताऱ्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांच्यावर अशाच एका प्रसंगामुळे अवघडल्याची परिस्थिती आली. (Satara news)
अजित पवार हे शनिवारी सातारा जिल्ह्यातील औंध येथे गेले होते. याठिकाणी श्रीमंत हर्षिता राजे इंग्लिश मीडियम हायस्कूलचा नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अजित पवार यांना लहानसा पुष्गपुच्छ आणि तलवार देऊन त्यांचा मानपान करण्यात आला. शरद पवार यांच्या तालमीत घडल्यामुळे अजित पवार एरवी हवेत तलवार उंचावणे किंवा क्रेनने हार घालून घेणे, असे प्रकार टाळताना दिसतात. परंतु, शनिवारी औंधच्या राणी गायत्रीदेवी यांनी अजित पवार यांच्यासमोरच मंचावर तलवार म्यानातून बाहेर काढली. त्यानंतर राणी गायत्रीदेवी यांनी सुरुवातीला ही तलवार हवेत उंचावून दाखवली. त्यानंतर त्यांनी ती तलवार अजित पवार यांना दाखवली. त्यावर अजित पवार यांनी फार विशेष प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, राणी गायत्रीदेवी यांनी यांनी त्यानंतर उत्साहाने ही तलवार हवेत फिरवली. यानंतर त्यांनी तलवार म्यान करुन पुन्हा हवेत उंचावत 'हर हर महादेव'ची घोषणा दिली. त्यावेळी अजित पवार हा सर्व प्रकार बाजुला उभे राहून कौतुकाने न्याहाळत होते. यानंतर ही तलवार अजित पवार यांना भेट म्हणून देण्यात आली. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
Ajit Pawar in Satara_ औंधच्या राणीसाहेबांनी म्यानातून तलवार उपसली, हवेत नाचवली, अजित पवार बघतच बसले#Ajitpwar #NCP #Maharshtrapolitics pic.twitter.com/0VryCYOVHb
— ABP माझा (@abpmajhatv) October 13, 2025
आणखी वाचा
एक मिनिट ऐकायला शिक...कागद दिलंय ना...; अजित पवारांनी झापलं, कार्यकर्त्यांचा काढता पाय, VIDEO
संग्राम जगताप यांचं वक्तव्य पक्षाच्या विचारधारेला धरुन नाही, याबाबत नोटीस काढलीय : अजित पवार

























