एक्स्प्लोर

ऑनलाईन सर्व्हिस महागात पडली, बँक खात्यातून 4 लाख 65 हजार गायब; सराफांची सायबर सेलकडे तक्रार

मोबाईल वापरणे, त्यातही स्मार्टफोन वापरणे ही आता प्रत्येकाची जीवनावश्यक बाब बनली आहे. मात्र मोबाईल हाताळताना काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

जळगाव : घरातील वॉशिंग मशिन दुरुस्तीसाठी गुगलवरुन सर्व्हिस सेंटरला कॉल केला, दरम्यान एपीके फाईल मोबाईलवर आली अन् दोन दिवसांनी एका व्यक्तीच्या मोबाईलमधून चक्क पावणे पाच लाख रुपये गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल (Mobile) वापरत असताना ऑटो डाऊनलोड सेटिंग सुरू राहिल्याने हॅकरने मोबाईल हॅक करून जळगाव मधील रहिवासी निलेश सराफ यांच्या बँक (Banking) खात्यातून तब्बल 4,65,000 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अलिकडच्या काळात मोबाईलवरुन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा ऑनलाईन खरेदी, आर्थिक व्यवहार ही देखील आपली गरज बनली आहे. मात्र, मोबाईल बँकिंग वापरताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी, हेच या घटनेतून दिसून येते.

मोबाईल वापरणे, त्यातही स्मार्टफोन वापरणे ही आता प्रत्येकाची जीवनावश्यक बाब बनली आहे. मात्र मोबाईल हाताळताना काळजी घेणे गरजेचे झाले आहे. मोबाईल सेटिंगमधील ऑटो डाऊनलोड सेटिंग सुरू राहिल्याचा फटका जळगावमधील निलेश सराफ यांना बसला असून, चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हॅक करत तब्बल पावणे 5 लाखांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव शहरातील रहिवासी असलेल्या निलेश सराफ यांच्या घरातील कपडे धुण्याचे मशीन खराब झाल्याने त्यांनी कपडे धुण्याचे मशीन खरेदी केलेल्या कंपनीला मशीन दुरुस्तीसाठी कॉल केला होता. या कॉल नंतर त्यांना ओटीपी मागण्यात आल्याच सराफ यांनी म्हटल. सराफ यांनी संबंधित कंपनीला ओटीपी दिल्यानंतर काही वेळात त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 4 लाख 65 हजार रुपये काढले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. निलेश सराफ यांच्या बँक खात्यातून पैसे काढले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीनं सायबर पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलस या घटनेचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक नितीन गणपुरे यांनी दिली.

दरम्यान, सायबर क्राईमला मी याबाबत गुन्हा नोंदवला असून पोलीस तपास करत आहेत. मात्र, गुगलवरुन कुठल्याही सर्व्हीस सेंटरचे नंबर काढून तुम्ही कुणालाही ओटीपी देऊ नका, असे आवाहन निलेश सराफ यांनी केले आहे.

हेही वाचा

शेतमजूर दाम्पत्यासाठी देवाभाऊ देवासारखे धावले; एका SMS मुळे आई-वडिलांस घडलं लेकांचं अंत्यदर्शन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report
Dharmendra Demise : रोमॅन्टिक हीरो ते बॉलिवूडचा सुपरस्टार..धर्मेंद्र! Special Report
Raj Thackeray : अखेरची निवडणूक, अस्तित्वाची लढाई? अन् सगळ्यांना मराठी माणूस आठवला.. Special  Report
Zero Hour Full BMC Election : मुंबईत पुन्हा मराठी-अमराठी वाद? मतांच्या ध्रुवीकरणाला खतपाणी?
Mahapalikecha Mahasangram Gadchiroli : काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढतीची शक्यता, नागरिकांच्या अपेक्षा काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
Embed widget