IPL Auction 2024 Batters And Bowlers : पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्कला जेवढा पैसा मिळाला तेवढा सगळ्या फलंदाजांना एकूण सुद्धा मिळाला नाही!
IPL Auction 2024 : लिलावात 10 संघांनी एकूण 72 खेळाडूंना खरेदी केले, ज्यावर 230.45 कोटी रुपये खर्च झाले. या खेळाडूंमध्ये 26 गोलंदाज, 25 अष्टपैलू, 13 फलंदाज आणि 8 यष्टीरक्षकांचा समावेश होता.
IPL Auction 2024 Batters And Bowlers : आयपीएल 2024 चा लिलाव गोलंदाजांच्या नावावर राहिला. लिलावात गोलंदाजांवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव करण्यात आला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वात महागडा गोलंदाज मिचेल स्टार्क विकला गेला. केकेआरने स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले. याशिवाय सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सला 20.50 कोटी रुपयांना खरेदी केले. लिलावात फक्त मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने सर्व फलंदाजांना विकत घेण्यासाठी जेवढे पैसे खर्च केले त्यापेक्षा जास्त पैसे घेतले. लिलावात फलंदाजांवर एकूण 44.20 कोटी रुपये खर्च झाले.
एक नजर या लिलावात किती फलंदाज आणि किती गोलंदाजांना खरेदी करण्यात आले.
लिलावात 10 संघांनी एकूण 72 खेळाडूंना खरेदी केले, ज्यावर 230.45 कोटी रुपये खर्च झाले. या खेळाडूंमध्ये 26 गोलंदाज, 25 अष्टपैलू, 13 फलंदाज आणि 8 यष्टीरक्षकांचा समावेश होता. लिलावात एकूण 26 गोलंदाजांची किंमत 90.05 कोटी रुपये आहे. एकूण विकल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये 30 विदेशी आणि 42 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. लिलावात 34 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश होता, त्यापैकी 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेत विकत घेतले गेले.
Mitchell Starc said, "I'm really excited to play under Shreyas Iyer and understand his thought process. Happy to be finally back at the best T20 league in the world". pic.twitter.com/bmGRVQuTXW
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 19, 2023
25 अष्टपैलू खेळाडूंवर एकूण 78.85 कोटी रुपये खर्च करण्यात आले. याशिवाय सर्व संघांनी मिळून 13 फलंदाजांवर 44.20 कोटी रुपये खर्च केले. सर्व संघांनी 8 विकेटकीपर 13.35 रुपयांना विकत घेतले. भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात महाग समीर रिझवी आहे, जो एक अनकॅप्ड खेळाडू आहे आणि उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. समीरचा चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात समावेश केला आहे.
Sameer Rizvi's coach said, "It's a very big thing that Sameer will get a chance to interact with MS Dhoni. It will be a huge opportunity for him to learn new things". (News18). pic.twitter.com/hzIptcYG8d
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 20, 2023
कोणत्या संघाने किती खेळाडू खरेदी केले?
- कोलकाता नाईट रायडर्स- 10 खेळाडू विकत घेतले (31.35 कोटी खर्च)
- दिल्ली कॅपिटल्स- 09 खेळाडू विकत घेतले (खर्च 19.05 कोटी)
- गुजरात टायटन्स- 08 खेळाडू खरेदी केले (30.30 खर्च)
- पंजाब किंग्स- 08 खेळाडू खरेदी केले (24.95 कोटी खर्च)
- मुंबई इंडियन्स- 08 खेळाडू खरेदी घेतले (16.70 कोटी खर्च)
- चेन्नई सुपर किंग्स- 06 खेळाडू खरेदी केले (30.40 कोटी खर्च)
- लखनौ सुपर जायंट्स- 06 खेळाडू खरेदी केले (खर्च 12.20 कोटी)
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर- 06 खेळाडू खरेदी घेतले (20.40 कोटी खर्च)
- सनरायझर्स हैदराबाद- 06 खेळाडू खरेदी घेतले (30.80 कोटी खर्च)
- राजस्थान रॉयल्स- 05 खेळाडू खरेदी केले (14.30 कोटी खर्च)
इतर महत्वाच्या बातम्या