IPL 2024 Playoffs Scenrio: 3 संघांचे समान गुण, कोणीही प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकतो; जाणून घ्या, नेमकं समीकरण!
IPL 2024 Playoffs Scenrio: आयपीएल 2024 च्या हंगामातील प्ले ऑफची स्पर्धा आता आणखी गुंतागुंतीचे होत आहे.
IPL 2024 Playoffs Scenrio: इंडियन प्रीमियर लीगमध्ये केवळ 11 लीग सामने शिल्लक आहेत. प्ले ऑफमध्ये खेळणाऱ्या संघांबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) 16 गुणांवर पोहोचल्यानंतर त्यांचे स्थान आता निश्चित झाले असले तरी तळाचे दोन संघ कोण असतील हे समजणे कठीण आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत 6 संघ आहेत त्यापैकी 3 संघांचे समान गुण आहेत.
आयपीएल 2024 च्या हंगामातील प्ले ऑफची स्पर्धा आता आणखीनच गुंतागुंतीचे होत आहे. सुरुवातीच्या सामन्यांतील पराभवानंतर बाद होण्याच्या मार्गावर असलेल्या संघांनी पलटवार केला. आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि आता गुजरात टायटन्स संघाने विजय मिळवून प्ले ऑफचे समीकरण गुंतागुंतीचे केले आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जचे संघ या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडले आहेत. याशिवाय सर्व संघांनी प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा दावा केला आहे.
12 गुणांवर तीन संघ-
चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे संघ 12-12 गुणांवर आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या संघाला आता शेवटचे दोन सामने राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळायचे आहेत. दिल्लीला बंगळुरू आणि लखनौशी टक्कर द्यावी लागेल. विराट कोहलीचा अव्वल फॉर्म कायम राहिला आणि त्याच्या संघाने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर चेन्नई आणि दिल्लीचे 16 गुणांपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न भंग पावेल. लखनौ संघाकडून हरल्यास 16 गुण मिळण्याच्या आशाही धुळीस मिळतील.
कोणताही संघ बाहेर पडू शकतो-
पॉइंट टेबलच्या सद्यस्थितीनुसार 6 संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. लखनौ आणि दिल्लीच्या संघांना एकमेकांविरुद्ध खेळावे लागले तर एकच संघ 16 गुणांपर्यंत पोहोचेल हे निश्चित. आरसीबीला चेन्नई आणि दिल्ली खेळायचे आहेत, म्हणजे एकतर हे दोन संघ गुण मिळवतील किंवा विराट कोहलीचे स्वप्न पुन्हा भंग होईल. प्ले ऑफचे प्रकरण खूपच गुंतागुंतीचे आहे आणि कोणताही संघ बाहेर पडू शकतो.
CHENNAI SUPER KINGS LOST & NRR IS DOWN..!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) May 10, 2024
- Good news for RCB, LSG, DC, GT. pic.twitter.com/TkR1p5Cf4P