एक्स्प्लोर

MI vs CSK: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या मॅचच्या निकालाचा अनोखा ट्रेंड, ज्या टीमनं टॉस जिंकला त्यांना...

IPL 2024 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आज सायंकाळी वानखेडे स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत. या लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मुंबई :आयपीएलमध्ये  (IPL 2024) आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आमने सामने येत आहेत. यंदाच्या आयपीएलमधील 29 वी मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडेल. आजच्या मॅचचं वैशिष्ट्य म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्समध्ये महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा खेळाडू म्हणून सहभागी असतील. यंदाच्या आयपीएलमध्ये दोघेही संघाचं नेतृत्त्व करत नाहीत. आजच्या मॅचच्या टॉससाठी चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि मुंबईकडून हार्दिक पांड्या मैदानात उतरेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता टॉस होईल. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील गेल्या काही  मॅचचा निकाल पाहिल्यास ज्या संघानं टॉस जिंकला आहे त्यांनीच मॅच जिंकली आहे. 

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 2019 च्या आयपीएलपासून ज्या संघानं टॉस जिंकला त्या संघाचा संबंधित मॅचमध्ये विजय झाला आहे. 2019 पासून दोन्ही संघात 9 मॅच झाल्या आहेत. यामध्ये चेन्नईनं पाचवेळा टॉस जिंकला आहे तर मुंबईनं चार वेळा टॉस जिंकला आहे. वानखेडे स्टेडियमवर जी टीम टॉस जिंकेल तिचं वर्चस्व राहतं.

मुंबई आणि चेन्नई यापूर्वीचे टॉस आणि निकाल

मुंबई इंडियन्सनं 2019 च्या आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये टॉस जिंकला होता. ती मॅच मुंबईनं एका रननं जिंकली होती. 2020 ला चेन्नईनं टॉस जिंकला त्यांनी ती मॅच 5 विकेटनं जिंकली होती. 2020 मध्ये मुंबई इंडियन्सनं टॉस जिंकला ती मॅच मुंबईनं 10 विकेटनं जिंकली. 2021 मध्ये मुंबईनं चेन्नई विरुद्ध टॉस जिंकला ती मॅच देखील त्यांनी 4 विकेटनं जिंकली होती. 2021 मध्ये दुसऱ्या मॅचमध्ये चेन्नईनं टॉस जिंकला होता, त्यांनी ती मॅच 20 धावांनी जिंकली होती. 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जनं टॉस जिंकला होता, ती मॅच 3 विकेटनं त्यांनी जिंकलेली. त्याच आयपीएलमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकला आणि मॅच  5 विकेटनं जिंकली होती. 

2023 मध्ये चेन्नईनं सुपर किंग्जनं दोन्ही वेळा टॉस जिकंला होता. त्यांनी त्यावेळी दोन्ही मॅचेस अनुक्रमे 7 आणि 6 विकेटनी जिंकल्या होत्या. दरम्यान, मुंबई आणि चेन्नई आतापर्यंत 36 वेळा आमने सामने आले असून मुंबईनं 20 वेळा विजय मिळवलेला आहे. तर चेन्नईला 16 वेळा विजय मिळाला आहे. 

मुंबई इंडियन्सचा संघ सहावी मॅच खेळणार असून वानखेडे स्टेडियमवरील चौथी मॅच असेल. वानखेडेवर आतापर्यंत तीन मॅच झाल्या असून त्यापैकी दोन मॅच मुंबईनं जिंकल्या आहेत. आज ते तिसरी मॅच जिंकतात याकडे मुंबईच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

संबंधित बातम्या : 

 RR vs PBKS : ट्रेंट बोल्टला कल्पना दिलेली, प्लॅन बी तयार ठेवलेला, हेटमायरनं मॅच जिंकल्यावर सगळं सांगितलं..

KKR Vs LSG Dream11 Prediction: सुनील नारायण, आद्रे रसेल, निकोलस पूरन...; आज कोणाला कर्णधार बनवाल, पाहा 11 खेळाडूंची परफेक्ट टीम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla Bus Accident: अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
Maharashtra Winter Temperature drops: नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :  11 डिसेंबर 2024 : ABP MajhaKurla Best Bus Accident Update : आरोपी चालकाने क्लच समजून बसच्या एक्सिलरेटरवर पाय दिल्याने अपघातRahul Gandhi Viral Video : राहुल गांधी किराना दुकानात वस्तू विकतात तेव्हाABP Majha Headlines :  8 AM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla Bus Accident: अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
Maharashtra Winter Temperature drops: नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Weather Update: उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Kurla Bus Accident: संजय मोरेचं पाऊल 'वाकडं' पडलं अन् घात झाला, क्लच समजून चुकून 'अ‍ॅक्सिलरेटर'वर पाय; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती
संजय मोरेचं पाऊल 'वाकडं' पडलं अन् घात झाला, क्लच समजून चुकून 'अ‍ॅक्सिलरेटर'वर पाय; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती
Embed widget