IPL 2024 MI vs CSK : सूर्यकुमारची जोरदार फटकेबाजी, मुंबई इंडियन्स प्रचंड आशावादी, पलटणनं चेन्नईचं टेन्शन वाढवलं
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सनं आजच्या चेन्नई विरुद्धच्या मॅचपूर्वी सूर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सूर्यकुमार यादव संघातल्यापासून मुंबईला दोन विजय मिळाले आहेत.
मुंबई : आयपीएलमध्ये (IPL 2024)आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आमने सामने येणार आहेत. यंदाच्या आयपीलमध्ये दोन्ही संघाचा प्रवास संमिश्र राहिला आहे.चेन्नई सुपर किंग्जनं पाच पैकी तीन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सनं देखील पाच पैकी दोन मॅचमध्ये विजय मिळवलेला आहे. आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमने सामने येतील. आयपीएलच्या 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सला पहिल्या तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.मुंबई इंडियन्सनं वानखेडेवर झालेल्या गेल्या दोन मॅचमध्ये विजय मिळालेला आहे. विशेष बाब म्हणजे टी-20 क्रिकेटमधील आयसीसी क्रमवारीत टॉपवर असलेला खेळाडू सूर्यकुमार यादव संघात परतल्यानंतर मुंबईला दोन विजय मिळालेले आहेत. मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या मॅचपूर्वी सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) व्हिडीओ शेअर केला आहे.
चेन्नईला धडकी भरवणारा व्हिडीओ मंबईकडून शेअर
मुंबई इंडियन्सच्या संघातील सूर्यकुमार यादवचं कमबॅक फायदेशीर ठरलं आहे. सूर्यकुमार यादव संघात परतल्यानंतर मुंबईला दोन्ही मॅचमध्ये विजय मिळाला आहे. सूर्यकुमार यादवला दिल्ली कॅपिटल्स विरोधात चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र, सूर्यानं आरसीबी विरुद्ध जोरदार फटकेबाजी केली होती. सूर्यकुमार यादवनं आरसीबी विरुद्ध 17 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. सूर्यानं 18 बॉलमध्ये 52 धावा करत मुंबईचा विजय सोपा केला होता. आज मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध भिडणार आहे. त्या मॅचपूर्वी मुंबई इंडियन्सनं सूर्यकुमार यादवचा नेट प्रॅक्टिसदरम्यानचा फटकेबाजी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सूर्यकुमार यादव मोठ मोठे फटके मारताना दिसत आहे.
Bringing the main character energy to #MIvCSK 🥵#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @surya_14kumar pic.twitter.com/72tmjeVyNc
— Mumbai Indians (@mipaltan) April 14, 2024
मुंबईला विजय मिळवणायचा असल्यास सूर्यावर मोठी जबाबदारी
मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टीम डेविड, रोमारियो शेफर्ड अशी तगडी फलंदाजी आहे. मात्र, सूर्यकुमार यादव ज्या पद्धतीनं बॉलर्सवर तुटून पडतो ते पाहता आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्याच्याकडून मुंबईला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
मुंबई आणि चेन्नईच्या लढतीबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज देशातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांची उत्सुकता देखील आजच्या मॅचच्या निमित्तानं शिगेला पोहोचली आहे. चेन्नईकडून महेंद्रसिंग धोनी आणि मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आमने सामने येतील. आजची मॅच पाहणं हे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असेल.
संबंधित बातम्या :