![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई
IPL : आयपीएलमध्ये काल झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दिल्लीनं आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या मुंबई विरुद्ध केली होती.
![PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई ipl 2024 mumbai indians luke wood became top most conceded bowler against delhi capitals PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/28/78cea2fed6f38d60d851873d82a2cecf1714304792015989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात काल दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मॅच पार पडली. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सला पराभव स्वीकारावा लागला होता. दिल्लीनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 257 धावा केल्या होत्या. मुंबईचा संघानं 247 धावा केल्या त्यामुळं त्यांना 10 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबई इंडियन्स 9 मॅचमध्ये 3 विजय आणि 6 पराभवांमुळं गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सकडून यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या ल्यूक वुडच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला. पाकिस्तान सुपर लीगमध्ये चांगली कामगिरी करणारा ल्यूक वुड आयपीएलमध्ये झिरो ठरला आहे. एका मॅचमध्ये सर्वाधिक धावा देणारा मुंबई इंडियन्सचा महागडा बॉलर ल्यूक वुड ठरला आहे.
पाकिस्तानातील पीएसएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ल्यूक वुडला मुंबई इंडियन्सनं संधी दिली होती. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडोर्फ याच्या जागी मुंबईनं ल्यूक वुडला संधी दिली होती. मुंबईकडून दिल्ली विरोधात खेळताना ल्यूक वुडनं त्याच्या नावावर नकोसा विक्रम केला. दिल्लीच्या फलंदाजांनी ल्यूक वुडच्या बॉलिंगवर जोरदार फटकेबाजी केली.
ल्यूक वुडनं चार ओवर टाकल्या त्यानं यामध्ये 68 धावा दिल्या. ल्यूक वुडला केवळ एक विकेट मिळाली. ल्यूक वुडनं क्वेना मफाफाचं रेकॉर्ड तोडलं. क्वेना मफाकानं मुंबई इंडियन्सकडून खेळताना 4 ओवरमध्ये 66 धावा दिल्या होत्या. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळताना त्यानं 66 धावा दिल्या होत्या.
मुंबई इंडियन्सचे सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज
ल्यूक वुडनं दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये 4 ओवरमध्ये 68 धावा दिल्या. क्वेना मफाकानं सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये 66 धावा दिल्या होत्या. लासिथ मलिंगानं 2017 मध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध 58 धावा दिल्या होत्या. डॅनियल सॅम्सनं 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 57 धावा दिल्या होत्या.
ल्यूक वुड सध्या मुंबई इंडियन्सनकडून आयपीएलमध्ये खेळत आहेत. इंग्लंडकडून क्रिकेट खेळतोय. आतापर्यंत त्यानं 2 वनडे आणि 5 टी-20 इंटरनॅशनल मॅच खेळल्या आहेत.
दरम्यान, मुंबई इंडियन्सला आतापर्यंत 9 पैकी सहा सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबई इंडियन्सनं केवळ तीन मॅचमध्ये विजय मिळवला असून ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत राहायचं असल्यास त्यांना राहिलेल्या सर्व मॅचेस मोठ्या फरकानं आणि चांगल्या नेट रनरेटसह जिंकाव्या लागतील.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)