(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 MS Dhoni: MS धोनी पुरस्कार घेण्यासाठीही आला नाही...; नेमकं काय झालंय?, चेन्नईच्या पराभवानंतर चर्चांना उधाण!
IPL 2024 MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) तीन षटकार व एक चौकार मारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. धोनीनं 11 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली.
IPL 2024 MS Dhoni: यंदाच्या आयपीएलमधील आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या गुजरातने घरच्या मैदानावर खेळताना शुक्रवारी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला (CSK) 35 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर गुजरातने 20 षटकांत 3 बाद 231 धावांचे डोंगर उभारले. यानंतर चेन्नईचा डाव 20 षटकांत 8 बाद 196 धावांवर रोखला गेला.
महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) तीन षटकार व एक चौकार मारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. धोनीनं 11 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली. मात्र तो संघाला यश मिळवून देऊ शकला नाही. गुजरात आणि चेन्नईच्या सामन्यानंतर नेहमीप्रमाणे एमएस धोनीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सामन्यानंतर धोनीला एका पुरस्काराठी बोलवण्यात आले तेव्हा तो पुरस्कार घेण्यासाठी धोनी आला नाही. धोनीच्या जागी चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने हा पुरस्कार स्वीकारल्याचे पाहायला मिळाले.
असं क्वचितच घडतं...
एमएस धोनीला इलेक्ट्रिक स्ट्रायकर पुरस्काराचा विजेता निवडण्यात आले. धोनीला पुरस्कार मिळाला पण तो घेण्यासाठी ऋतुराज गायकवाड आला. यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न आले. तसेच धोनी पुरस्कार घेण्यासाठी आला का नाही?, याबाबत सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लढवले जात आहे. धोनीला पुरस्कार मिळाला असेल आणि तो स्वीकारायला आला नसेल, असे क्वचितच घडते.
धोनीची लोकप्रियता कायम
महेंद्रसिंह धोनीनं गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला विजेतेपद मिळवून दिलं होतं. महेंद्रसिंह धोनीचं वय सध्या 42 वर्ष असून तो जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. सध्या धोनी जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसला तरी त्याच्या लोकप्रियतेत कमी झालेली नाही. चेन्नईची मॅच ज्या ठिकाणी असेल तिथं धोनीचे चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
शुभमन गिल आणि साई सुदर्शनने केले विक्रम-
गुजरात टायटन्ससाठी शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोन्ही सलामीवीरांनी शतकी खेळी खेळली. गिलने 55 चेंडूत 104 धावा केल्या, ज्यात त्याने 9 चौकार आणि 6 षटकार मारले. दुसरीकडे, सुदर्शनने 51 चेंडूत 103 धावांची खेळी केली. यामध्ये त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 7 षटकार आले. गिल-सुदर्शन ही आयपीएलच्या इतिहासात सामन्याच्या एका डावात शतके झळकावणारी तिसरी जोडी आहे. याशिवाय गिल आणि सुदर्शन यांनी आयपीएलच्या इतिहासात पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे. गिल आणि सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी केली. त्याच्या आधी 2022 मध्ये क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी केली होती.