IPL 2024: चेपॉकवर कोण कुणाला भारी? धोनीची चेन्नई की आरसीबी, आकडे काय सांगतात? जाणून घ्या
IPL 2024: आयपीएलच्या 17 व्या पर्वाची सुरुवात चेन्नईमधील चेपॉकवर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि फाफ डु प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीनं होणार आहे.
चेन्नई : भारतासह जगभरातील क्रिकेट चाहते ज्या स्पर्धेची वाट पाहत असतात ती इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होत आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नईची टीम यंदा देखील आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या टीमला आतापर्यंत एकाही आयपीएलमध्ये विजेतेपद जिंकता आलेलं नाही.यंदाच्या 17 व्या सीझनमध्ये विजेतेपद पटकावण्याच्या इराद्यानं बंगळुरु देखील स्पर्धेची सुरुवात विजयानं करण्याच्या प्रयत्नात असेल.
चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये आतापर्यंतच्या 16 आयपीएलमध्ये 31 मॅच झालेल्या आहेत. या सामन्यांचं रेकॉर्ड पाहिलं असता चेन्नईनं 20 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर, आरसीबीनं 10 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. दोन्ही टीममधील एक मॅच अनिर्णित राहिली होती.
चेपॉकवरचा इतिहास काय सांगतो?
चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 8 मॅच झालेल्या आहेत. यापैकी 7 मॅचमध्ये चेन्नईनं विजय मिळवत आरसीबीला पराभूत केलं आहे. आरसीबीला 2008 नंतर चेपॉकवर विजय मिळवता आलेला नाही. चेन्नईचं होम ग्राऊंड असलेल्या चेपॉकवर सीएसके आणि आरसीबी यांच्यात 2023 च्या आयपीएलमध्ये लढत झाली होती. या लढतीत चेन्नईनं 6 विकेट गमावून 226 धावा केल्या होत्या. त्या मॅचमध्ये डिवोन कॉन्वेनं 83, शिवम दुबेनं 52 धावा केल्या होत्या. फाफ डु प्लेसिसच्या 62 आणि ग्लेन मॅक्सवेलच्या 76 धावांची खेळी वाया गेली होती. चेन्नईनं ती मॅच जिंकली होती.आरसीबीच्या टीमला यंदा चेपॉकवरील पराभवाची मालिका खंडीत करण्याची संधी आहे.
सीएसकेनं आतापर्यंत पाचवेळा आयपीएलच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये धोनीच्या टीमनं विजय मिळवला होता. यंदा धोनीच्या टीमकडे सहाव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आतापर्यंत एकाही स्पर्धेत विजेतेपद पटकावता आलेलं नाही. आरसीबीनं 2009, 2011 आणि 2016 ला अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, त्यांना उपविजेतपदावर समाधान मानावं लागलं होतं.दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जची बॅटिंगसाठी यंदाच्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, राचीन रविंद्र, ऋतुराज गायकवाड, डिवॉन कॉन्वे, अजिंक्य रहाणे यांच्यावर असेल. दुसरीकडे आरसीबीकडून फाफ डु प्लेसिस, रजत पाटीदार, विराट कोहली, अनुज रावत, दिनेश कार्तिक यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल तर ग्लेन मॅक्सवेल सारखा ऑलराऊंडर देखील त्यांच्याकडे आहे. मोहम्मद सिराज आणि आकाशदीप हे बॉलिंगची धुरा सांभाळतील.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जची बॅटिंगसाठी यंदाच्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, राचीन रविंद्र, ऋतुराज गायकवाड, डिवॉन कॉन्वे, अजिंक्य रहाणे यांच्यावर असेल. दुसरीकडे आरसीबीकडून फाफ डु प्लेसिस, रजत पाटीदार, विराट कोहली, अनुज रावत, दिनेश कार्तिक यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल तर ग्लेन मॅक्सवेल सारखा ऑलराऊंडर देखील त्यांच्याकडे आहे. मोहम्मद सिराज आणि आकाशदीप हे बॉलिंगची धुरा सांभाळतील.
संबंधित बातम्या :
IPL 2024 : धोनी, रोहित अन् विराटसह पाच जण खेळलेत प्रत्येक आयपीएल हंगाम