एक्स्प्लोर

MI vs RCB, IPL 2024 : बुमराहनं पाया रचला, ईशान-सूर्यकुमारनं विजयाचा कळस चढवला, आरसीबीचा पाचवा पराभव

MI vs RCB : जसप्रीत बुमराहनं आरसीबीच्या पाच विकेट घेतल्यानंतर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीमुळं मुंबईनं सात विकेटनं मॅच जिंकली आहे.

मुंबई :  मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं विजयासाठी दिलेलं 197 धावांचं लक्ष्य पार केलं आहे. मुंबई इंडियन्सच्या डावाची आक्रमक सुरुवात सलामीवर ईशान किशन आणि रोहित शर्मानं केली. ईशान किशन आणि रोहित शर्मानं शतकी भागिदारी केली. मुंबईच्या 100 धावा झाल्यानंतर पहिली विकेट गेली. ईशान किशननं 34 बॉलमध्ये 69 धावा करुन मुंबईच्या विजयाचा पाया रचला. यानंतर मैदानात फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवनं फटकेबाजी केली. सूर्यकुमार यादवनं वादळी खेळी करत 52 धावा केल्या आणि मुंबईला विजयाजवळ नेऊन पोहोचवलं. दुसरीकडे रोहित शर्मानं देखील 38 धावा केल्या. बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह आणि फलंदाजीत ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवनं केलेल्या कामगिरीच्या जोरावर मुंबईनं सहज विजय मिळवला. हार्दिक पांड्यानं धोनी स्टाइलनं विजयी षटकार मारला. मुंबईनं 7 विकेटनं मॅच जिंकली. 

ईशान किशन आणि सूर्यकुमारची फटकेबाजी गेमचेंजर 

मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॉलिंग करताना आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 196 धावांमध्ये रोखलं. आरसीबीकडून रजत पाटीदार, फाफ डु प्लेसिस आणि  दिनेश कार्तिकनं अर्धशतकं झळकावली. या तिघांच्या कामगिरीच्या जोरावर आरसीबीनं 196 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईच्या सलामीवीरांनी डावाची सुरुवात आक्रमकपणे केली. ईशान किशननं 34 धावांमध्ये 69 धावांची खेळी केली. तर रोहित शर्मानं 38 धावा केल्या. मुंबईला रोहित शर्मा आणि ईशान किशननं 100 धावांची सलामीची भागिदारी करुन दिली. ईशान किशन बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवनं 52 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवनं 17 बॉलमध्ये अर्धशतक केलं.  सूर्यकुमार यादवनं चार षटकार आणि पाच चौकार मारले. मुंबईच्या टॉप ऑर्डरनं चांगली खेळी केल्यानं नंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मानं विजयावर नाव सहजपणे कोरलं. 

मुंबई इंडियन्सचा दुसरा विजय, आरसीबीचा पाचवा पराभव

फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील आरसीबीचा यंदाच्या आयपीएलमधील पाचवा पराभव झाला. दुसरीकडे मुंबई इंडियन्सनं  यंदाच्या आयपीएलमध्ये  सलग दुसरा विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं होम ग्राऊंडवर दिल्ली कॅपिटल्स नंतर  आरसीबीला पराभूत केलं आहे. 

आजच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचलं आहे.  मुंबई इंडियन्सची पुढील मॅच आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणार आहे. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सला विजय मिळवता येतो का ते पाहावं लागणार आहे. मुंबईला वानखेडे स्टेडियमवर विजयाची हॅट्रिक करण्याची संधी आहे. 

संबंधित बातम्या :

Rohit Sharma : मुंबईच्या कॅप्टनपदाच्या वादावर सिद्धूचं मोठं भाष्य, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माविषयी बोलताना सगळंच काढलं...

IPL 2024, MI vs RCB : वानखेडेवर बुम बुम बुमराहचा जलवा, आरसीबीचा निम्मा संघ तंबूत पाठवला, युजवेंद्र चहलला धक्का देत पर्पल कॅपचा मानकरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget