(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024: KKR vs MI: मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकाता नाइट रायडर्सचा 18 धावांनी विजय
IPL 2024: KKR vs MI: कोलकाताकडून हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेलने उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन केलं.
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आज सामना झाला. या सामन्यात कोलकाताने बाजी मारत 18 धावांनी मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. मुंबई इंडियन्सकडून इशान किशन आणि तिलक वर्मा वगळता कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही. कोलकाताकडून हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेलने उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. तिघांनीही प्रत्येकी 2 विकेट्स पटकावल्या.
पावसामुळे सामन्याला उशीरा सुरुवात-
पावसामुळे सामन्याला उशीरा सुरुवात झाली. तसेच 16 षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नाणेफेक जिंकत मुंबईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कोलकाताना फलंदाजी करताना 157 धावा केल्या. मुंबईला विजयासाठी 158 धावांची आवश्यकता असणार आहे. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने 42 धावांची खेळी केली. तर नितीश राणाने 33 धावा केल्या. मुंबईकडून पियुष चावलाने आणि जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या.
मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन:
इशान किशन, नमन धीर, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, अंशुल कम्बोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
Mumbai Indians Playing XI: Ishan Kishan (wk), Naman Dhir, Suryakumar Yadav, Nehal Wadhera, Tilak Varma, Hardik Pandya (c), Tim David, Anshul Kamboj, Piyush Chawla, Jasprit Bumrah, Nuwan Thushara
कोलकाता नाइट रायडर्सची प्लेइंग इलेव्हन:
फिलिप सॉल्ट, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, रिंकू सिंह, नितेश राणा, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
Kolkata Knight Riders Playing XI: Philip Salt (wk), Sunil Narine, Venkatesh Iyer, Shreyas Iyer (c), Rinku Singh, Nitish Rana, Andre Russell, Ramandeep Singh , Mitchell Starc, Harshit Rana, Varun Chakaravarthy