IPL 2024 KKR Gautam Gambhir: मी बॉलिवूड अभिनेता नाही, क्रिकेटर आहे...; गौतम गंभीर रविचंद्रन अश्विनला असं का म्हणाला?
IPL 2024 KKR Gautam Gambhir: अश्विनसोबतच्या संभाषणात भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले.
IPL 2024 KKR Gautam Gambhir: कोलकाता नाइट रायडर्सचे (KKR) मार्गदर्शक आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला एक मुलाखत दिली आहे. अश्विनसोबतच्या संभाषणात गंभीरने अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले.
अश्विनला दिलेल्या मुलाखतीत गौतम गंभीर म्हणाला की, माझ्यासाठी मोठी चिंता ही आहे की किती तरुण भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळू इच्छितात. मला आशा आहे की आयपीएल त्यांना भारतासाठी खेळण्यास मदत करेल. शॉर्टकट (सोपा मार्ग) सिद्ध होणार नाही, असं गंभीरने सांगितले.
भारतीय क्रिकेटपटूंना आयपीएलचा फायदा झाल्याचं गंभीरने सांगितले. तसेच आजच्या युगात, जेव्हा मी आंतरराष्ट्रीय टी-20 संघ पाहतो आणि जेव्हा भारताविरुद्ध खेळण्याचा विचार केला जातो. तेव्हा दोन-तीन संघांव्यतिरिक्त मला फारशी स्पर्धा दिसत नाही. अनेक संघ भारताच्या ताकदीची बरोबरी करू शकत नाहीत. त्यामुळे, मला वाटते की आज आयपीएल आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटपेक्षा खूप स्पर्धात्मक बनले आहे.
मी बॉलिवूड अभिनेता नाही, क्रिकेटर आहे-
गौतम गंभीरच्या चेहऱ्यावर नेहमी आक्रमकता दिसते, तो नेहमी नावाप्रमाणे गंभीर असताना दिसतो. याबाबतही देखील अश्विनने प्रश्न विचारला. यावर गंभीर म्हणाला की, अनेकदा लोक मला बोलतात की मी हसत कधी हसत नाही. मी नेहमी आक्रमक असतो. पण लोक मला हसताना बघायला येत नाही. संघाला विजयी होताना लोकांना पाहायचं असतं. यावर मी काहीही करु शकत नाही. मी इंटरटेनमेंट नाही, मी बॉलिवूड अभिनेता नाहीय किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात नाही, मी एक क्रिकेटर आहे, असं गंभीरने सांगितले.
आज केकेआरचा सामना-
दोन महिन्यानंतर आयपीएल 2024 प्लेऑफच्या सामन्याला सुरुवात होत आहे. आज रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात क्वालिफायर 1 सामना होत आहे. फलंदाजी हे दोन्ही संघाची ताकद आहे. त्यामुळे या सामन्यात धावांचा पाऊस पडू शकतो. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात आमनासामना होणार आहे.
प्ले ऑफचं वेळापत्रक
21 मे - कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद ( क्वालिफायर 1)
22 मे - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, अहमदाबाद ( एलिमिनेटर )
24 मे - क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ वि. एलिमिनेटर विजेता, चेन्नई ( क्वालिफायर 2)
26 मे - क्वालिफायर 1 मधील विजेता संघ वि. क्वालिफायर 2 विजेता, चेन्नई ( फायनल)