IPL 2024 Virat Kohli And MS Dhoni: MS धोनी हात न मिळवताच गेला; विराट कोहली त्याच्या शोधात चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये धावला, Video
IPL 2024 Virat Kohli And MS Dhoni: प्ले ऑफमध्ये स्थान मिळाल्याचा आनंद व्यक्त करत असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या खेळाडूंकडून धोनीचा अपमान झाल्याचा दावा करण्यात येतोय.
IPL 2024 Virat Kohli And MS Dhoni: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्जला बंगळुरुनं 27 धावांनी पराभूत केलं. आरसीबीला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासठी चेन्नईवर 18 धावांनी विजय मिळवणं आवश्यक होतं. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी 17 धावांची गरज होती. बंगळुरुच्या यश दयालने एक विकेट घेत केवळ 7 धावा दिल्या आणि बंगळुरुचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित केला.
प्ले ऑफमध्ये स्थान मिळाल्याचा आनंद व्यक्त करत असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या खेळाडूंकडून एमएस धोनीचा (MS Dhoni) अपमान झाल्याचा दावा करण्यात येतोय. धोनी आणि चेन्नईचे खेळाडू आरसीबीच्या खेळाडूंसोबत हस्तोंदलन करण्यासाठी थांबले होते. मात्र, आरसीबीचे खेळाडू जल्लोष करत असल्यानं धोनीनं आरसीबीच्या सपोर्ट स्टाफला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आणि तो निघून गेला. यावेळी धोनीने कर्णधार ऋतुराज गायकवाडला हस्तांदोलनावेळी नेतृत्व करण्यास सांगितले.
Dhoni was the first man standing for a hand-shake but RCB players made them wait for so long and then Thala literally did, "fk it, i am leaving, you enjoy your playoffs qualification" pic.twitter.com/5Berft5JzJ
— Div🦁 (@div_yumm) May 19, 2024
धोनीच्या शोधात कोहली चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये-
चेन्नई आणि बंगळुरुच्या या सामन्यातील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. कोहलीच्या आधी धोनी हात न मिळवताच चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला होता. यावेळी दोघांची भेटही झाल्याचे बोलले जात आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये जाताना दिसत आहे. धोनी आणि विराटची चांगली मैत्री आहे. याबाबत विराटने अनेकदा उघडपणे भाष्य देखील केले आहे.
The fact that Kohli chased Dhoni to the dressing room after the game when he left without shaking hands tells you a lot about Kohli's character. True sportsmanship ❤️pic.twitter.com/H4Z6nQOqUG
— Yashvi (@BreatheKohli) May 19, 2024
धोनी मैदानावर असेपर्यंत मॅच वाचवणं अवघड होतं-ड्यू प्लेसिस
महेंद्रसिंह धोनी मैदानावर होता तोपर्यंत चेन्नई सुपर किंग्ज मॅच आमच्या हातून घेऊन जाईल किंवा नेट रनरेटमध्ये आम्हाला मागं टाकेल असं वाटत होतं. मात्र, यश दयालनं अखेरची ओव्हर टाकली ती अद्भूत होती, असं ड्यू प्लेसीसने सांगितले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात धोनी 13 चेंडूत 25 धावा केल्या.
प्ले ऑफचं वेळापत्रक
21 मे - कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद ( क्वालिफायर 1)
22 मे - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, अहमदाबाद ( एलिमिनेटर )
24 मे - क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ वि. एलिमिनेटर विजेता, चेन्नई ( क्वालिफायर 2)
26 मे - क्वालिफायर 1 मधील विजेता संघ वि. क्वालिफायर 2 विजेता, चेन्नई ( फायनल)