एक्स्प्लोर

IPL 2024 Virat Kohli: दोन लोकांमुळे कोहलीची कारकीर्द 'विराट' बनली; स्वत:च व्हिडीओद्वारे केला खुलासा, नेमकं काय म्हणाला?

IPL 2024 Virat Kohli: विराट कोहलीने आयपीएलसोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपले नाव कोरले आहे. जगातील अव्वल खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश आहे.

IPL 2024 Virat Kohli: विराट कोहलीचा (Virat Kohli) संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आयपीएल 2024 च्या (IPL 2024) प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आपले नशीब आजमावेल. त्याचा सामना शनिवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे. आरसीबीचा दिग्गज विराट कोहलीने (Virat Kohli) यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. या हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. 

विराट कोहलीने आयपीएलसोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपले नाव कोरले आहे. जगातील अव्वल खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश आहे. कोहलीने नुकताच त्याच्या कारकिर्दीबद्दल एक खुलासा केला आहे. कोहलीने सांगितले की, सुरेश रैनाने सुरुवातीला टीम इंडियासाठी माझे नाव पुढे केले होते. कोहली सलामीवीर म्हणून टीम इंडियामध्ये फिट बसत नव्हता. पण रैनामुळे त्याला संधी मिळाली. माजी मुख्य निवडक दिलीप वेंगसरकर यांचेही नाव कोहलीने घेतले.

जिओ सिनेमावर बोलताना कोहली म्हणाला, "2008 मध्ये आम्ही ऑस्ट्रेलियात इमर्जिंन कप खेळत होतो. मला तो काळ अजूनही आठवतो, त्याने (सुरेश रैना) माझ्याबद्दल ऐकले असेल. तो स्पर्धेच्या मध्यावर आला. यापूर्वी बद्रीनाथ कर्णधार होता आणि त्यानंतर त्याला (रैना) कर्णधारपद मिळाले. प्रवीण आमरे आमचे प्रशिक्षक होते. मग मला बाहेर बसायला लावलं. कारण पहिल्या दोन-तीन सामन्यांमध्ये मी कामगिरी केली नव्हती. मग त्याने माझे नाव पुढे केले. दिलीप वेंगसाकर सर त्यावेळी मुख्य निवडक होते. यावेळी विराट कोहलीने 120 धावांची दमदार इनिंग खेळली. या सामन्यात तो नाबाद राहिला. महत्त्वाची बाब म्हणजे कोहली मधल्या फळीत फलंदाजी करत होता.पण त्याने न्यूझीलंड इमर्जिंगविरुद्ध सलामी दिली आणि स्वत:ला सिद्ध केले. याआधी त्याला दोन-तीन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती.

प्ले ऑफच्या फेरीसाठी बंगळुरुचं समीकरण कसं असेल? 

आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. 18 मे रोजी आरसीबी आणि चेन्नई यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे.  चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील विजेता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. 18 मे रोजी बंगळुरुमध्ये त्यांचा सामना होणार आहे. चेन्नईने आरसीबीचा पराभव केला, तर ते थेट पात्र ठरणार आहेत. पण आरसीबीचा संघ मात्र समिकरणात अडकलाय. चेन्नईचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे आरसीबीला मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागेल. जर प्रथम फलंदाजी केली तर आरसीबीला 18 धावांनी सामना जिंकावा लागेल. धावांचा पाठलाग करताना आरसीबीला 18.1 षटकात आव्हान पार करावे लागेल. हैदराबादच्या सामन्यावरही आरसीबीचं प्लेऑफचं गणित अवलंबून आहे. जर हैदराबादचा उर्वरित दोन्ही सामन्यात दारुण पराभव झाला तर आरसीबी आणि चेन्नई हे दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतात. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget