(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Watch: हार्दिक पांड्याची लाज काढली, रोहितच्या चाहत्यांनी 'छपरी-छपरी' चे लावले नारे
Hardik Pandya Chapri Chants: हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील मुंबई इंडियन्सनं आयपीएलमधील आपली परंपरा कायम राखली.
Hardik Pandya Chapri Chants: हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील मुंबई इंडियन्सनं आयपीएलमधील आपली परंपरा कायम राखली. 2013 पासून मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) प्रत्येक हंगामात पहिला सामना गमावलाच आहे. गुजरातविरोधात नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium in Ahmedabad) मुंबईचा सहा धावांनी पराभव झाला. या सामन्यावेळी हार्दिक पांड्याला रोहित शर्माच्या चाहत्यांकडून ट्रोल करण्यात आले. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यानं हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) जोरदार ट्रोल केले. हार्दिक पांड्या नाणेफेकीला आला, त्यावेळी सर्वांनीच चाहत्यांनी मुंबईचा राजा रोहित शर्मा.. आशी घोषणाबाजी केली. त्याशिवाय सामना झाल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांनी छपरी छपरी आशा घोषणा दिल्या. हार्दिक पांड्याला जोरदार ट्रोल केले.
हार्दिक पांड्याला ट्रोल केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत हार्दिक पांड्या स्टेडियममध्ये परत येत असताना दिसतोय. त्यावेळी स्टेडियममध्ये बसलेल्या मुंबईच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याला पाहून छपरी छपरी असे नारे लावले.. चाहत्यांचा हा रोष हार्दिक पांड्याच्याही कानावर पडला. पण त्यानं कोणताही रिअॅक्शन दिली नाही. तो खाली मान घालून गपचूप गेल्याचं दिसलं. चाहत्यांनी लाईव्ह सामन्यात हार्दिक पांड्याबद्दलचा आपला राग व्यक्त केलाय. गुजरातमध्ये सामना असताना हार्दिक पांड्याला ट्रोल करण्यात आले. आता मुंबईत सामना होणार आहे, त्यावेळी काय होईल? असा सवाल नेटकऱ्यांना पडलाय.
पाहा व्हिडीओ -
Ahmedabad crowd calling Hardik Pandya 'chhapri' 😳 #ipl #HardikPandya #chapri #GTvMI pic.twitter.com/0QKEgHZrJY
— Lalit Kumar (@Lalit96L) March 25, 2024
हार्दिक पांड्या ड्रेसिंग रुमकडे जात होता, त्यावेळी स्टँड्समध्ये बसलेल्या चाहत्यांनी 'छपरी-छपरी' अशी घोषणाबाजी केली. हार्दिक पांड्यानं कोणताही प्रतिक्रिया दिली नाही. तो शांतपणे निघून गेला. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयपीएलच्या इतिहासात भारतीय चाहत्यांना भारतीय चाहत्यांनीच ट्रोल केल्याचं दिसत नाही. पण रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हाकालपट्टी करुन हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिल्यानं चाहत्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
मुंबईची हराकिरी -
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातने शानदार विजय मिळवला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरातने सहा धावांनी विजय मिळवला. मुंबईला अखेरच्या 5 षटकात फक्त 43 धावांच गरज होती, हातात सहा विकेटही होत्या. पण मुंबईच्या फलंदाजांनी ऐनवेळी नांगी टाकली. मुंबईचा संघ 162 धावांपर्यंतच मजल मारु शकला. मुंबईकडून रोहित शर्माने 43 धावांची खेळी केली. तर जसप्रीत बुमराहने गोलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या.