एक्स्प्लोर

CSK vs SRH : चेन्नई एक्स्प्रेस विजयाच्या ट्रॅकवर परतली, ऋतुराज गायकवाड - तुषार देशपांडेची दमदार कामगिरी, हैदराबादवर दणदणीत विजय

IPL 2024 : आयपीएलच्या 46 व्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जनं सनरायजर्स हैदराबादवर 78 धावांनी विजय मिळवला आहे.

चेन्नई :  चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद  (Sun Risers Hyderabad) यांच्यात आयपीएलमधील 46 लढत पार पडली. चेन्नईच्या होम ग्राऊंडवर दोन्ही संघ आमने सामने आले. सनरायजर्स  पॅट कमिन्सनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला.  चेन्नईनं पहिल्यांदा फलंदाजी करताना  20 ओव्हरमध्ये 3 बाद 212  धावा केल्या. चेन्नईच्या डावात कॅप्टन ऋतुराज गायकवाडच्या 98 धावा आणि डॅरिल मिशेलं 52 धावा महत्त्वाच्या ठरल्या. चेन्नईनं केलेल्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादला करता आला नाही. हैदराबादचा संघ  134 धावा करु शकला. चेन्नई सुपर किंग्जनं अशा प्रकारे स्पर्धेतील पाचव्या विजयावर नाव कोरलं.  

हैदराबादचा सलग दुसरा पराभव

सनरायजर्स हैदराबादला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. सनरायजर्स हैदराबादचा हा चौथा तर सलग दुसरा पराभव ठरला. चेन्नई सुपर किंग्जनं विजयासाठी समोर ठेवलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. तुषार देशपांडेनं दुसऱ्याच ओव्हरमध्ये हैदराबादच्या धोकादायक ट्रेविस हेडला बाद केलं. यानंतर लगेचच त्यानं अनमोलप्रीत सिंह शुन्यावर बाद केलं. तुषार देशपांडे यानेच त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्माला बाद करत हैदराबादला तिसरा धक्का दिला. या धक्क्यांमधून हैदराबादचा संघ सावरु शकला नाही. यानंतर मार्क्रम आणि नितीशकुमार रेड्डी डाव सावरतात असं वाटत असतानाच हैदराबादला चौथा धक्का रवींद्र जडेजानं दिला. जडेजानं नितीशुकमार रेड्डीला आऊट केलं.  यानंतर हैदराबादचे फलंदाज क्रमाकमानं बाद होत गेले. हैदराबादचा संघ 134 धावांवर बाद झाला. 

तुषार देशपांडेच्या वादळात हैदराबादची फलंदाजी कोलमडली 

मराठमोळ्या तुषार देशपांडेनं हैदराबादला दुसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये एकूण तीन धक्के दिले. हैदराबादचे सलामीवर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा या दोन्ही सलामीवीरांना तुषार देशपांडेनं बाद केलं. याशिवाय अनमोलप्रीतसिंहला देखील बाद केलं. यानंतर चेन्नईच्या मराठमोळ्या बॉलरनं हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सला देखील बाद करुन संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तुषार देशपांडेनं चार विकेट घेतल्या,मुस्तफिजूर रहमान आणि मथिशा पथिरानानं प्रत्येकी दोन आणि रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर यांनी एक एक विकेट घेतली. 

चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्यांदा फलंदाजी करताना होमग्राऊंड असलेल्या चेपॉकवर 212 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडनं 98 धावांची खेळी केली.  डॅरिल मिशेलनं 52 आणि शिवम दुबेनं 39 धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाड 20 व्या ओव्हरमध्ये मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला.

 संबंधित बातम्या :

CSK vs SRH : तुषार देशपांडेनं हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग लावला, धोकादायक ट्रेविस हेड-अभिषेक शर्माचा करेक्ट कार्यक्रम

Will Jacks : 6,6,4,6,6 विल जॅक्सनं राशिद खानला अस्मान दाखवलं, गुजरातच्या प्रमुख गोलंदाजांना धू धू धुतलं, पाहा व्हिडीओ

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget