एक्स्प्लोर

CSK vs SRH : तुषार देशपांडेनं हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग लावला, धोकादायक ट्रेविस हेड-अभिषेक शर्माचा करेक्ट कार्यक्रम

Tushar Deshpande : चेन्नई सुपर किंग्जनं सनरायजर्स हैदराबादपुढं विजयासाठी 213 धावांचं आव्हान ठेवलं होतं. तुषार देशपांडेनं सुरुवातीलाच हैदराबादला तीन धक्के दिले.

चेन्नई : आयपीएलच्या (IPL 2024) 46 व्या मॅचमध्ये गतविजेती चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद  (Sun Risers Hyderabad) यांच्यात सुरु आहे. चेन्नई आणि हैदराबाद चेपॉकवर आमने सामने आले आहेत. सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या चेन्नईनं 20 ओव्हरमध्ये 212  धावा केल्या. चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं 98 धावा केल्या. तर, डॅरिल मिशेलं 52 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये हैदराबादसाठी आक्रमक खेळी करणाऱ्या सलामीवीरांना तुषार देशपांडेनं बाद केलं. तुषार देशपांडेनं हैदराबादला तीन धक्के देत त्यांच्या फलंदाजीला सुरुंग लावला.   

तुषार देशपांडेनं हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग लावला

चेन्नई सुपर किंग्जला आजच्या मॅचमध्ये विजय आवश्यक आहे. मराठमोळ्या तुषार देशपांडेनं हैदराबादला दुसऱ्या ओव्हरमध्येच दोन धक्के दिले. ट्रेविस हेडला 13 धावांवर तुषार देशपांडेनं बाद केलं. यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेल्या अनमोलप्रीत सिंगला तुषार देशपांडेनं शुन्यावर आऊट केला. यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये तुषार देशपांडेनं पुन्हा एकदा हैदराबादला धक्का देत अभिषेक शर्माला 15 धावांवर बाद केलं. चेन्नई सुपर किंग्जचा बॉलर तुषार देशपांडेनं सनरायजर्स हैदराबादला सुरुंग लावला. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा आणि अनमोलप्रीत सिंगला तुषार देशपांडेनं बाद करुन हैदराबादला डावाच्या सुरुवातीलाच बॅकफूटवर ढकललं. 

पाहा व्हिडीओ

ऋतुराज गायकवाडचं शतक हुकलं

चेन्नई सुपर किंग्जनं होमग्राऊंड असलेल्या चेपॉकवर पहिल्यांदा फलंदाजी करताना 212 धावा केल्या. चेन्नईकडून सर्वाधिक धावा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं केल्या. त्यानं 98 धावांची खेळी केली. ऋतुराज शिवाय डॅरिल मिशेलनं 52 आणि शिवम दुबेनं 39 धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाड 20 व्या ओव्हरमध्ये मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला.

 दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जला यापूर्वी चेपॉकवर झालेल्या मॅचमध्ये लखनौ सुपर जाएंटसकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादला देखील त्यांच्या होम ग्राऊंडवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळं आज विजयाच्या ट्रॅकवर कोण परतणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर, चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

संबंधित बातम्या:

IPL 2024, RCB vs GT : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून मोहीम फत्ते, जॅक्सनं शतकासह धोनी स्टाईलनं मॅच संपवली, गुजरात टायटन्सला होम ग्राऊंडवर लोळवलं

Glenn Maxwell : कमबॅक करताच कॅप्टननं विश्वास टाकला, ग्लेन मॅक्सवेलं करुन दाखवलं, थेट शुभमन गिलला दणका, Video

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
Amol Mitkari and Narhari Zirwal: नरहरी झिरवाळांच्या बचावासाठी अमोल मिटकरी मैदानात, म्हणाले, 'सुपारी देणारा कोण लवकरच समोर येईल'
नरहरी झिरवाळांच्या बचावासाठी अमोल मिटकरी मैदानात, म्हणाले, 'सुपारी देणारा कोण लवकरच समोर येईल'
Maharashtra live blog updates: मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा; एकनाथ शिंदेंचे निर्देश
मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा; एकनाथ शिंदेंचे निर्देश
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
Embed widget