एक्स्प्लोर

IPL 2024 CSK vs RR: राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने मारली बाजी; 5 विकेट्सने मिळवला विजय, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

IPL 2024 CSK vs RR: राजस्थानविरुद्धच्या विजयानंतर चेन्नईने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 

IPL 2024 CSK vs RR: राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने बाजी मारत 5 विकेट्सने हा सामना जिंकला. राजस्थानविरुद्धच्या विजयानंतर चेन्नईने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 

चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर रचिन रविंद्रने 27, डॅरिल मिचेलने 22, मोईन अलीने 10, शिवम दुबे 18,  रवींद्र जडेजा 5 आणि समीर रिझवीने 15 धावा केल्या. राजस्थानकडून रविचंद्रन अश्विनने 2 विकेट्स घेतल्या. तर युझवेंद्र चहल आणि नेंद्र बर्गरला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. 

राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी राजस्थानने 5 विकेट्स गमावत 141 धावा केल्या. राजस्थानकडून रियान परागने सर्वाधिक धावा केल्या. रियान परागने 35 चेंडूत 47 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 1 चौकार लगावला. यशस्वी जैस्वालने 24, जॉस बटलरने 21, संजू सॅमसनने 15 आणि ध्रुव जुरेलने 28 धावा केल्या. चेन्नईकडून सिमरजीत सिंगने 3 विकेट्स पटकावल्या. तर तुषार देशपांडे 2 विकेट्स घेण्यात यशस्वी राहिला.

चेन्नई सुपर किंग्सची Playing XI:

रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (c), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश तिक्षणा

राजस्थान रॉयल्सची Playing XI:

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शुभम दुबे, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

MS धोनी आज निवृत्तीची घोषणा करणार?

चेन्नई सुपर किंग्स (CSK) आयपीएल 2024 मधील आज घरच्या मैदानावर हंगामातील शेवटचा सामना खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत (RR) होणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईने चाहत्यांना सामन्यानंतर मैदानावर थांबण्याची खास विनंती केली आहे, ज्याचा संबंध चाहते एमएस धोनीच्या (MS Dhoni) आयपीएल निवृत्तीशी जोडत आहेत. चेन्नईच्या या घोषणेनंतर अनेक चाहते भावूकही झाल्याचे पाहायला मिळत आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नईचा राजस्थान विरुद्ध सामना होणार आहे. चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर चेन्नईचा हा शेवटचा सामना असेल. सामन्यापूर्वी, चेन्नईने सोशल मीडियावर कॅप्शनसह एक पोस्ट जारी केली, "सुपर चाहत्यांना खेळानंतर येथे थांबण्याची विनंती आहे!" पुढे लिहिले होते, "तुमच्यासाठी काही खास येत आहे." याशिवाय पोस्टरमध्ये चाहत्यांना सामना संपल्यानंतर थांबण्याची विनंतीही करण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

IPL 2024: 'तुम्हाला 400 कोटी रुपये मिळाले तर...', केएल राहुलसाठी वीरेंद्र सेहवाग मैदानात, लखनौच्या मालकाला खडसावले!

ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!

चेन्नईने सामना गमावला, पण सर्वांना चीअरलीडरची पडली भुरळ; अभिनेत्रींना टक्कर देणारं सौंदर्य, पाहा Photo's

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget