IPL 2023 : इतिहास रचला...आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट आता चहलच्या नावावर, ब्राव्होला टाकले मागे
IPL Highest Wicket Taker : ईडन गार्डन्स मैदानावर चहल याने नीतीश राणा याला तंबूत पाठवत इतिहास रचलाय.
IPL Highest Wicket Taker : कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात ईडन गार्डन्स मैदानावर सामना रंगलाय. संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत कोलकात्याच्या फलंदाजांना ठरावीक अंतराने बाद केलेय. राजस्थानचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याने नीतीश राणाला बाद करत मोठा विक्रम केलाय... नीतीश राणा चहलची आयपीएलमधील 184 वी विकेट ठरलाय. चहल याने डेवेन ब्राव्हो याचा विक्रम मोडत आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरालय.
कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील सामन्याआधी आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये चहल संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर होते. चहल आणि ब्राव्हो यांच्या नावावर 183 विकेट होत्या. ईडन गार्डन्स मैदानावर चहल याने नीतीश राणा याला तंबूत पाठवत इतिहास रचलाय.
युजवेंद्र चहल याने यंदाच्या हंगामात भेदक मारा केलाय. चहल फॉर्मात दिसतोय.. त्याने 12 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. चहलने दोन वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. चहल याने 141 डावात आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. सध्या खेळणाऱ्या गोलंदाजात पीयूष चावला, अमित मिश्रा आणि अश्विन यांच्याकडून चहलला आव्हान मिळू शकते.. पण विकेटचे अंतर जास्त आहे.
IPL इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज -
युजवेंद्र चहल - 184 विकेट (142 सामने)
ड्वेन ब्रावो - 183 विकेट (159 सामने)
पीयूष चावला - 174 विकेट (175 सामने)
अमित मिश्रा - 172 विकेट (160 सामने)
रविचंद्रन अश्विन - 171 विकेट (192 सामने)
लसीथ मलिंगा - 170 विकेट (122 सामने )
भुवनेश्वर कुमार - 163 विकेट (156 सामने)
सुनील नारायण - 159 विकेट (158 सामने)
हरभजन सिंह - 150 विकेट (160 सामने)
रविंद्र जाडेजा - 148 विकेट (193 सामने)
YUZVENDRA CHAHAL - THE LEADING WICKET TAKER IN THE HISTORY OF THE IPL. pic.twitter.com/zH7o99MTZz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 11, 2023
Milestone 🚨 - Yuzvendra Chahal becomes the leading wicket-taker in IPL 👏👏#TATAIPL | @yuzi_chahal pic.twitter.com/d70pnuq6Wi
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
आरसीबीसाठी सर्वाधिक विकेट -
आयपीएलमध्ये चहल याने दमदार कामगिरी केली आहे. 142 सामन्यातील 141 डावात चहलच्या नावावर 183 विकेट आहेत. चहल याने सर्वाधिक विकेट आरसीबीसाठी घेतल्या आहेत. चहल याने 2014 ते 2021 या काळात त्याने आरसीबीसाठी खूप विकेट घेतल्यात. चहल याने आरसीबीसाठी 113 सामन्यात 139 विकेट घेतल्या आहेत. राजस्थान रॉयलमध्येही चहल याने तुफानी कामगिरी केली आहे. चहल याने 28 सामन्यात 44 विकेट घेतल्या आहेत.
MI in IPL Playoff : मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहचणार का? काय आहेत समीकरणे
IPL 2023 : दिल्लीचा IPL मधील गाशा गुंडाळला, पराभवाची कारणे काय?
IPL 2023 : खत्म-टाटा-बाय-बाय... या 10 खेळाडूंची अखेरची आयपीएल स्पर्धा!
IPL 2023 : पर्पल कॅपची स्पर्धा रंगतदार, ऑरेंज कॅप या खेळाडूच्या डोक्यावर, पाहा कोण कोण आहेत दावेदार