एक्स्प्लोर

IPL 2023 : दिल्लीचा IPL मधील गाशा गुंडाळला, पराभवाची कारणे काय?

IPL 2023, David Warner : दिल्लीच्या पराभवाची कारणे काय आहेत ? कोणत्या कारणामुळे स्पर्धेतील आव्हान संपले...

IPL 2023, David Warner : डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघाचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. दिल्लीचे प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी फक्त दोन टक्के इतकी आहे. पण इतर संघाची स्थिती पाहाता दिल्लीचे आव्हान संपल्यात जमा आहे. दिल्लीच्या पराभवाची प्रमुख कारणे कोणती आहेत.. कशामुळे दिल्लीला फटका बसला पाहूयात..

फलंदाजांचा फ्लॉप शो - 

डेविड वॉर्नर याचा अपवाद वगळता दिल्लीच्या एकाही फलंजाला मोठी धावसंख्या उभरता आली नाही. मिचेल मार्श, रोवमन पॉवेल, यश धुल, मनीष पांडे यांच्यासारखे फलंदाज अपयशी ठरत आहेत. दिल्लीच्या पराभवाचे हेही प्रमुख कारण असू शकते. 

खराब नेतृत्व -

डेविड वॉर्नर याला प्रभावी नेतृत्व करता आले नाही. दिल्लीच्या पराभवाचे खराब नेतृत्व हेही एक कारण आहे. वॉर्नरने गोलंदाजांचा योग्य वापर केला नाही. कुलदीप यादव याला कधी गोलंदाजी द्यायची, यात वॉर्नरची मोठी चूक होतेय.. गतवर्षी कुलदीपने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या... त्याशिवाय भन्नाट फॉर्मात असलेल्या अक्षर पटेल याला फलंदाजी बढती दिली जात नाही.. अन्यथा तो आणखी धावा जमवू शकेल. त्याशिवाय ऋषभ पंतची कमी दिल्लीला जाणवत आहे. ऋषभ पंतचे आक्रमक नेतृत्व आणि फलंदाजीची कमी दिल्लीला जाणवतेय.

गोलंदाजांची खराब कामगिरी -

 प्रमुख गोलंदाजांना धावा रोखण्यात अपयश आले आहे. अक्षर पटेल आणि कुलदीपचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला धावा रोखता आल्या नाहीत. एनरिख नॉर्खिया लयीत दिसत नाही.. याचा फटका दिल्लीला बसत आहे. 

सलामी जोडी फ्लॉप - 

11 सामन्यानंतरही दिल्लीला अद्याप दमदार सलामी जोडी मिळालेली नाही. डेविड वॉर्नर याच्यासोबत विविध फलंदाजांना अजमावले.. पण धावा निघाल्या नाहीत. पृथ्वी शॉ याला यंदा अपयशी ठराल.. मागील पाच डावात तर दिल्लीच्या सलामी फलंदाजांना फक्त 61 धावांची सलामी देता आली आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट सलामी भागिदारी 60 इतकी आहे. पाचपैकी तीन सामन्यात दिल्लीचे सलामी फलंदाजांनी शून्य धावांची सलामी दिली. दिल्लीच्या पराभवाचे हे एक प्रमुख कारण आहे. 

दिल्ली या संघाचे गणित बिघडवणार ?

दिल्लीला 11 सामन्यात सात पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे दिल्लीचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. पण दिल्ली इतर संघाचे प्लेऑफमधील गणित बिघडवू शकते. दिल्लीचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. यापैकी दोन सामने पंजाबविरोधात आहेत.. तर एक सामना चेन्नईसोबत आहे. 13 मे आणि 17 मे  रोजी दिल्ली पंजाबसोबत भिडणार आहे.  20 मे रोजी दिल्ली पुन्हा एकदा चेन्नईसोबत दोन हात करणार आहे.  

आतापर्यंत आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी -

1. एक एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्ने दिल्लीचा 50 धावांनी पराभव केला. 

2. चार एप्रिल रोजी गुजरातकडून दिल्लीचा सहा विकेटने पराभव झाला..

3. 8 एप्रिल रोजी राजस्थाननेही दिल्लीला 57 धावांनी हरवले. 

4. 11 एप्रिल रोजी मुंबईने दिल्लीला सहा विकेटने हरवले.. 

5. 15 एप्रिल रोजी आरसीबीने दिल्लीला 23 धावांनी हरवले... दिल्लीला लागोपाठ पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. 

6. 20 एप्रिल रोजी अखेर दिल्लीने विजयाचे खाते उघडले.. दिल्लीने चार विकेटने कोलकात्याचा पराभव केला. 

7. 24 एप्रिल रोजी  दिल्लीने हैदराबादचा सात धावांनी पराभव केला. 

8. 29 एप्रिल रोजी गैदराबादने दिल्लीला 9 धावांनी हरवत पराभवाचा वचपा काढला... दिल्लीचा हा सहावा पराभव होता.. 

9. 2 मे रोजी दिल्लीने गतविजेत्या गुजरातला पाच धावांनी हरवले.... 

10. 6 मे रोजी आरसीबीचा सात विकेटने पराभव करत दिल्लीने प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवले... 

11 . 10 मे रोजी चेन्नईने दिल्लीचा पराभव केला.  

आणखी वाचा :
IPL 2023 Points Table : चेन्नईची प्लेऑफच्या दिशेने आगेकूच, दिल्लीचे आव्हान संपले, पाहा गुणतालिकेची स्थिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget